Travel by train without a ticket : आता विना तिकीट करू शकाल रेल्वेने प्रवास, रेल्वेने बनवला खास नियम

MHLive24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तुम्ही रिजर्वेशन शिवायही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. आता अचानक प्रवास करावा लागला तर घाबरण्याची गरज नाही.(Travel by train without a ticket)

यापूर्वी, असा प्रसंगाला तर तत्काळ तिकीट बुकिंग नियमांचा पर्याय होता. पण त्यातही तिकीट मिळणे सोपे नव्हते.

आता अशा प्रसंगात रेल्वे तुम्हाला अशी सुविधा देत आहे, ज्याअंतर्गत तुम्ही आता आरक्षणाशिवाय प्रवास करू शकता.

Advertisement

प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास

जर तुमच्याकडे रिजर्वेशन नसेल आणि तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचे असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता. तिकीट चेकर कडे जाऊन तुम्ही तिकिटे अगदी सहज मिळवू शकता.

हा नियम रेल्वेनेच केला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच TTE शी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर TTE तुमच्या तुम्हाला जेथे जायचे आहे त्या स्थानापर्यंत तिकीट तयार करेल.

Advertisement

जागा रिकामी नसली तरी त्यावर पर्याय आहे

ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास, TTE तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास नकार देऊ शकते. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे रिजर्वेशन नसेल तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंडासह, प्रवासाचे एकूण भाडे भरून तिकीट काढावे.

रेल्वेचे खालील महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे

Advertisement

प्लॅटफॉर्म तिकीट

प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. त्यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे. भाडे आकारताना, निर्गमन स्टेशन देखील तेच स्थानक मानले जाईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच वर्गाचे भाडे देखील द्यावे लागेल ज्यामध्ये तुम्ही प्रवास करणार आहात.

तुमची सीट कधीपर्यंत असते तुमची ?

Advertisement

जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणाने चुकली तर TTE तुमची सीट पुढील दोन स्टेशनपर्यंत कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजेच पुढील दोन स्थानकांवर तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचून तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा, दोन स्टेशनांनंतर, टीटीई आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशाला जागा देऊ शकते. पण तुमच्यासमोर दोन स्टेशनचा पर्याय आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker