World biggest Car
World biggest Car

MHLive24 टीम, 20 मार्च 2022 :- World biggest Car : जर तुम्हाला एखादी अवाढव्य तसेच आकर्षित करणारी कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहोत. जगातील प्रत्येकाला हमर (अवाढव्य) कार खरेदी करायची असते. तीचा मोठा आकार आणि प्रत्येक रस्त्यावर चालण्याची क्षमता लोकांना त्याकडे आकर्षित करते. हमरची ताकद आणि क्षमता पाहता त्याचे H4 मॉडेल अमेरिकन आर्मी वापरते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका हमरबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही कधीच खरेदी करू शकत नाही, पण तीला पाहण्यासाठी तुम्हाला यूएईला जावे लागेल. ही जगातील सर्वात मोठी Hummer H1 X3 SUV आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hummer H1 X3 ची वैशिष्ट्ये 

या सर्वात मोठ्या हमरला H1 X3 असे नाव देण्यात आले आहे. जर तुम्हाला ही हमर पाहायची असेल तर तुम्हाला UAE च्या ऑफ रोड हिस्ट्री म्युझियममध्ये जावे लागेल. या कारची उंची 18 फूट आहे.

त्याच वेळी ती 42 फूट लांब आणि 18 फूट रुंद आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कार फक्त तिथेच उभी नाही तर ती वेळोवेळी चालवली जाते.

प्रसिद्ध कारचे प्रसिद्ध मालक 

हमर H1 X3 चे मालक शेख हमद बिन हमदान अल नाहयान आहेत. त्यांना कारची खूप आवड आहे आणि ते वेळोवेळी त्यांच्या गाड्या बदलत राहतात. त्यांच्याकडे मोटारींचा मोठा संग्रह आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup