Period leave for womens : ‘ह्या’ कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, महिला कामगारांना मिळणार 12 दिवसांची पीरियड लीव

MHLive24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- लोकप्रिय शैक्षणिक कंपनी बायजूस ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. मंगळवारी, कंपनीने सांगितले की त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी रजा धोरण अर्थात लीव पॉलिसी बदलले आहे, जेणेकरून कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी लवचिक पद्धतीने काम करू शकतील. यामध्ये ‘पीरियड लीव्हज’ आणि चाइल्ड केअर लीव्हचा समावेश आहे.(Period leave for womens)

आता तुम्हाला १२ दिवसांची रजा मिळणार आहे

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, हे नवीन धोरण कर्मचार्‍यांचा आनंद, कामकाजाच्या जीवनात सुसूत्रता, लवचिकता आणि कामाच्या ठिकाणी संवेदनशीलता याला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Advertisement

बायजूस च्या नवीन चाइल्ड केयल लीवनुसार, 12 वर्षांपर्यंत जर मुले असतील तर कर्मचारी वार्षिक सात सुट्या घेऊ शकतात. या सुट्ट्या अनेक वेळा घेता येतात आणि या अंतर्गत अर्ध्या दिवसाची रजा देखील घेता येते.

बैलेंस वर्क कल्चर निर्माण करण्यासाठी, बायजूस च्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना एका वर्षात एकूण 12 दिवसांची ‘पीरियड लीव’ मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. बायजूसमध्ये सुमारे 12,000 कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी काम करतात.

प्रसूती रजेत वाढ

Advertisement

नवीन मॅटर्निटी लीव्ह पॉलिसी अंतर्गत, 26 आठवड्यांच्या सशुल्क रजेव्यतिरिक्त, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना 13 आठवड्यांची अतिरिक्त सशुल्क रजा देखील देईल. अशाप्रकारे, वडील झाल्यावर मिळणाऱ्या पितृत्व रजेची संख्या सातवरून 15 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनेही असाच निर्णय घेतला होता. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून 10 दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली होती. आजही देशात पीरियड्स हा एक साइलेंट टॉपिक आहे ज्यावर लोक उघडपणे बोलू इच्छित नाहीत.

स्वच्छता आणि जागरुकता नसल्यामुळे अनेक वेळा महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात परिस्थिती आणखी वाईट आहे, जिथे सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर अजूनही सामान्य नाही.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker