Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना पद नको, २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा कोण ?

0 17

MHLive24 टीम, 28 जून 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सांगतात, ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये. वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांना बाजूला सारलं आहे. आता २०२४ मध्ये भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?, याबाबत त्यांनी खुलासा केला पाहिजे, भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

ईटीव्ही भारताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते :- गेल्या कित्येक दिवसांपासून सुब्रमण्यम स्वामी सरकारची कानउघाडणी करत आहेत. चीनची घुसखोरी, कोरोना, राम मंदिर या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. तर २०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.

Advertisement

चीननं देशात घुसखोरी केल्यानंतर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं. गलवान, कैलाश रेंजमध्ये आपण करुन दाखवलं. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळलो. हे चर्चेचं गुऱ्हाळ मला समजत नाही. आपली जमीन आहे, आपल्या छातीवर बसले आहेत. त्यांच्य़ाशी चर्चा काय करायची.

आपल्याला त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चीनसोबत युद्ध करणं गरजेचं आहे. चीन जगासमोर आपल्याला दाबत असल्याचं दाखवत आहे. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे, अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला खडसावलं.

Advertisement

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहीजे. कार्यकर्त्यांना विचारलं नाही, तर वाजपेयींसारखी परिस्थिती होईल, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं. त्याचबरोबर २०२४ मध्ये भाजपाचंच असं सांगण्यासही ते विसरले नाही.

जम्मू काश्मीरमधील नेत्यांची बैठकीही अमेरिकेच्या दबावात बोलवण्यात आल्याची टीका त्यांनी केली. तसेच कोरोनास्थितीवरुनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. वाढलेल्या अहंकारामुळे दुसऱ्या लाटेत देशाचं नुकसान झालं. आता तिसरी लाट येणार असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Advertisement

देशात आणीबाणीसारखी स्थिती नाही. आम्ही मुक्तपणे फिरू शकतो. आम्हाला कुणीही तुरुंगात टाकत नाही. त्यावेळेस आम्हाला कोणताच अधिकार नव्हता. मी भाजपामध्ये आहे, मला कोणती गोष्ट आवडली नाही, तर मी टीका करु शकतो. मात्र काँग्रेसमध्ये आजही कुणी असं करु शकत नाही.

आजची स्थिती आणीबाणीशी जोडणं चुकीचं ठरेल”, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.राम मंदिराच्या शिलान्यासासाठी आमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली. राममंदिर खटला जिंकवण्यात मोलाचा सहभाग होता, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement