Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

काय सांगता! ‘ह्या’ ठिकाणी लस घेण्यासाठी दिले जातेय सोन्याचे नाणे व स्कूटर

0

MHLive24 टीम, 9 जून 2021 :- देशातील बर्‍याच भागात लोक कोरोनाची लस घेणे टाळत आहेत. माहितीच्या अभावामुळे किंवा अफवांमुळे बरेच लोक लसबद्दल भीती बाळगतात. परंतु यादरम्यान दक्षिण भारतात लस घेतल्यावर बरीच बक्षिसे मिळाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

तामिळनाडूच्या कोवलम मध्ये लस घेतल्यानंतर लोकांना सोन्याचे नाणी आणि स्कूटर दिले जात आहेत. हा कार्यक्रम परिसरातील काही तरुणांनी सुरू केला आहे. शहराचे पहिले 100% लसीकरण क्षेत्र बनविणे हे या तरुणांचे उद्दीष्ट आहे.

Advertisement

6400 पैकी फक्त 58 लोकांनी घेतली ही लस :- चेन्नईच्या बाहेरील भागात मच्छिमारांची वस्ती कोवलम असून त्यांची लोकसंख्या 14,300 आहे आणि त्यापैकी 6,400 वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणारे आहेत. परंतु लसीच्या भीतीमुळे गेल्या दोन महिन्यांत येथे केवळ 58 लोकांनी लस घेतली आहे.

या दरम्यान, तिन संस्थांच्या स्वयंसेवकांनी जास्तीत जास्त लोकांना लसी देण्यासाठी एक आकर्षक डील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांमध्ये एसएन रामदास फाउंडेशन, एसटीएस फाउंडेशन आणि चिराज ट्रस्ट यांचा समावेश आहे.

Advertisement

देत आहे तगडा इनाम :- येथे लस घेण्यासाठी येणार्यांना बिर्याणीही दिली जात आहेत. ही डील आणखी आकर्षक करण्यासाठी, टीमने साप्ताहिक लकी ड्रॉ तयार केला ज्यात तीन लोकांना मिक्सर, एक ग्राइंडर आणि 2 ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येते. भाग्यवान विजेत्यांना बक्षीस म्हणून रेफ्रिजरेटर, एक वॉशिंग मशीन आणि स्कूटरही दिले जात आहे.

50 लाख जमा केले :- या तरुणांनी या अभियानासाठी 50 लाख रुपये जमा केले असून शहराच्या बाहेरील भागातही 50,000 लोकांना लसी देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही योजना गेल्या शनिवारी सुरू करण्यात आली होती आणि तेव्हापासून लोकांनी ही लस घेण्यास रस दर्शविला. स्वयंसेवकांचा असा दावा आहे की मोहीम सुरू होण्यापूर्वी केवळ 50 लोकांना लस देण्यात आली होती आणि आता दररोज 100 हून अधिक लोक लसीकरण करीत आहेत.

Advertisement

टीव्ही अभिनेत्याची घेतली मदत :- योजना सुरू करण्यापूर्वी त्यांनी लसीचे महत्त्व सांगून लोकांना जागरूक करण्याचे नियोजन केले. म्हणून या स्वयंसेवकांनी व्हिडिओ बनविण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी एका टीव्ही अभिनेत्याची मस्त घेतली. त्याने लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ पाठवले.

तमिळनाडूमध्ये कोरोनाची 2,44, 289 सक्रिय प्रकरणे आहेत. राज्यात संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या 22,37,233 आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 5 राज्यांमध्ये तमिळनाडूचे नावही समाविष्ट आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement