Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

30 हजार कोटींची देणगी देऊन गुंतवणुकीमधील ‘बादशहा’ वॉरेन बफेट यांचा राजीनामा

0 0

MHLive24 टीम, 24 जून 2021 :- जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक अब्जाधीश वॉरेन बफे यांनी बुधवारी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. हे फाउंडेशन जगातील सर्वात मोठ्या खाजगी सेवाभावी संस्थांपैकी एक आहे.

वॉरेन बफे हे या फाउंडेशनचे विश्वस्त तसेच फाउंडेशनच्या सर्वात मोठ्या देणगीदारांपैकी एक आहेत. ते नेहमीच ट्रस्टला दान देत असतात. बुधवारी राजीनामा देण्याबरोबरच त्यांनी ट्रस्टला 4.1 अब्ज डॉलर्स किमतीचे बर्कशायर हॅथवेचे शेअर्स दान करण्याची घोषणा केली.

Advertisement

वॉरेन बफेट यांनी मागील वर्षी गेट्स फाऊंडेशनला आपल्या बर्कशायरचे जवळपास 2 अब्ज डॉलर्सचे शेअर्स देणगी म्हणून दिले होते.

त्यांनी 2006 मध्येच जाहीर केले होते की मृत्यू होण्यापूर्वी तो आपल्या 99% संपत्ती मानवतेच्या भल्यासाठी खर्च करण्यासाठी देईल. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ते सतत देणगी देत राहतात. बुधवारी, 4.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 हजार 392 कोटी रुपयांची संपत्ती दान करण्याच्या घोषणेसह बफेट म्हणाले की, त्याने आपले अर्धे लक्ष्य साध्य केले आहे.

Advertisement

“आजच्या 4.1 अरब डॉलर्सच्या योगदानामुळे मी अर्धा मार्गाने पार केला आहे ” असे वॉरेन बफेट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 2006 सालीच 90 वर्षीय वॉरेन बफेट यांनी आपली 99 टक्के संपत्ती समाजसेवा कामात देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ते दरवर्षी पाच सेवाभावी संस्थांना मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत.

परंतु, वॉरेन बफे यांनी आपल्या निवेदनात गेट्स फाऊंडेशनच्या मंडळाचा राजीनामा का दिला आहे हे स्पष्ट केले नाही. त्यांनी संस्थेच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या कार्यासाठी निश्चितपणे पाठिंबा दर्शविला आहे.

Advertisement

जगातील सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर मे महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु असे असूनही त्यांनी गेट्स फाऊंडेशनच्या कामात एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

जगातील आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या नामांकित संस्थांपैकी 21 वर्षांपासून कार्यरत असणारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे नाव अग्रेसर आहे. त्याच्या दोन दशकांच्या कामकाजादरम्यान, फाऊंडेशनने गरीबी आणि रोगाविरूद्ध लढा देण्यासाठी 50 अब्ज डॉलरहून अधिक खर्च केला आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement