व्यवसाय करायचाय आणि बँक मुद्रा लोन देत नाहीये ? मग ‘ही’ बातमी वाचाच

MHLive24 टीम, 5 जून 2021 :-  पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. नॉन-कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली. पीएमएमवाय अंतर्गत दिलेली कर्जे मुद्रा कर्जाच्या वर्गवारीत आहेत.

ही कर्जे वाणिज्य बँका, लघु वित्त बँक, मायक्रो फायनान्स संस्था (एमएफआय) आणि एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या) द्वारे दिली आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण या योजनेंतर्गत कर्ज घेऊ शकता. परंतु जर एखादी बँक मुद्रा योजनेंतर्गत आपल्याला कर्ज देण्यास नकार देत असेल तर आपण त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. येथे आम्ही या योजनेचा तपशील आणि तक्रार क्रमांक देऊ.

Advertisement

जाणून घ्या मुद्रा योजनेच्या 3 कॅटेगिरी ? :- मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते. जर तुम्हाला यामध्ये आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला शिशु कर्जाची म्हणजेच 50 हजार रुपयांची मदत मिळेल. त्याचबरोबर किशोर मुद्रा कर्ज योजनेंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जे मिळू शकतील. तरूण कर्ज प्रकारात 10 लाखांपर्यंतची सुविधा दिली जाऊ शकते. मुद्रा योजनेंतर्गत लघु उत्पादक युनिट, दुकानदार आणि फळ व भाजीपाला विक्रेते कर्ज घेऊ शकतात.

अर्ज कसा करावा ? :- सर्व प्रथम, आपल्या कर्जाची आवश्यकता किती आहे हे आपण निश्चित करा. आवश्यक असेल तेव्हढ्याच कर्जासाठी अर्ज करा. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुद्रा योजनेच्या वेबसाइटवर जाऊन आवश्यक फॉर्म भरावा लागेल. येथे आम्ही आपल्याला एक लिंक देत आहोत (https://www.mudra.org.in/)

Advertisement

‘ह्या’ नंबरवर दाखल करा तक्रार :- काही राज्यांचे स्पेशल नंबर देण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय स्तरासाठी 2 क्रमांक जारी करण्यात आले आहे. 1800–180–1111 आणि 1800–11–0001 दोन्ही राष्ट्रीय-स्तरीय क्रमांक आहेत. आपण देशातून कोठूनही या बद्दल तक्रार करू शकता.

याशिवाय उत्तर प्रदेश – 18001027788, उत्तराखंड – 18001804167, बिहार – 18003456195, छत्तीसगढ़ – 18002334358, हरियाणा – 18001802222, हिमाचल प्रदेश – 18001802222, झारखंड – 18003456576, राजस्थान – 18001806546, मध्य प्रदेश – 18002334035 व महाराष्ट्र – 18001022636 या नम्बरवर तक्रार करू शकता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit