Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कार घ्यायचिये ? मग मारुतीची ‘ही’ ऑफर वाचा; होईल 41000 रुपयांची बचत

0 5

MHLive24 टीम, 21 जून 2021 :- कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे सुस्त पडलेल्या भारताचे ऑटो सेक्टर पुन्हा एकदा तेजीत दिसून येत आहे, ज्यामध्ये कार उत्पादक केवळ त्यांच्या कारची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक ऑफरच देत नाहीत तर नवीन फीचर्ससह मोटारी लॉन्च करत आहेत.

अनेक कंपन्या शानदार ऑफर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या नेक्सा मोटारींवर बंपर सवलत देत आहे. यामध्ये तुम्हाला Baleno, Ignis, XL6, S-Cross आणि सियाझ अशा कारवर 41 हजार रुपयांपर्यत सूट मिळू शकते.

Advertisement

या नेक्सा मोटारींवर उपलब्ध सवलत मर्यादित काळासाठी आहे आणि ती वेगवेगळ्या राज्ये आणि डिलरशिपमध्ये बदलू शकते. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया…

Maruti Suzuki NEXA Baleno :- या कारवर आपणास 41,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच्या 5 वेरिएंट्स वर डिस्काउंट दिली जात आहे आणि यात बालेनो सिग्मा एस + वर 17,500 रुपयांची सूट, बालेनो सिग्मा एमटीवर 41 हजार सवलत, बलेनो डेल्टा एमटीवर 31 हजार रुपयांची सूट, बलेनो अल्फा आणि झेटा एमटी वर 26 हजार सवलत आहे. Baleno CVT वर 16 हजारांची सूट मिळत आहे. यात रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि फाइनेंस डिस्काउंट समाविष्ट आहे.

Advertisement

Maruti Suzuki NEXA Ciaz :- या कारवर 30 हजार रुपयांची सूट मिळत आहे ज्यात 15 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस, 3 हजार रुपये कॉर्पोरेट सूट, 28,300 रुपयांपर्यंत X10 किट आणि 3हजारांची फाइनेंस डिस्काउंट उपलब्ध आहे.

Maruti Suzuki NEXA Ignis :- या कारवर तुम्हाला 36,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. इग्निस सिग्मा व्हेरियंटवर एकूण 36,500 रुपयांचा डिस्काउंट आणि बलेनो सिग्मा एमटीवर 31,000 रुपयांची सूट मिळेल.

Advertisement

Maruti Suzuki NEXA XL6 :- या कारवर फारशी सवलत दिली जात नाही. यामध्ये तुम्हाला केवळ 3,000 रुपयांची फायनान्स सूट मिळू शकते.

Maruti Suzuki NEXA S-Cross :-  या कारवर तुम्हाला 38,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. यात सिग्मावर 23 हजार रुपयांपर्यंतची सूट तर अन्य व्हेरिएंटवर 38 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit