Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

विवेक ओबेरॉय यांनी शाळेत मुलींना प्रभावित करण्यासाठी घेतली संजय दत्तची मदत , मग घडलं असं काहीतरी…

0 0

MHLive24 टीम, 26 मे 2021 :- बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी २००२ साली राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि सुमारे दोन दशकांपासून ते या चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. विवेकने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की शाळेत असताना त्याने मुलींवर कसा प्रभाव पाडला होता.

संजयबरोबर शूटआऊट अॅट लोखंडवालामध्ये काम केलेल्या अभिनेत्याने खुलासा केला की संजय दत्त विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय यांच्यासमवेत चित्रपटाच्या शूटिंगसाठी अजमेरमध्ये होता. त्यानंतर विवेकची भेट संजय सोबत करून द्यायची कल्पना त्याच्या वडिलांना सुचली आणि सुरेशने संजय दत्तलाही आपल्यासोबत आणले.

Advertisement

विवेक पुढे म्हणतो, “जेव्हा वडिलांनी शाळेत येऊन मला आश्चर्यचकित केली तेव्हा मला फार आश्चर्य वाटले.” त्यानंतर जेव्हा मी लांब केस असलेले संजय दत्त गाडीतून बाहेर पडताना पाहिले तेव्हा मला धक्का बसला, ते वडिलांसोबत शुटिंग करत होते आणि मला भेटायला आले होते .

संजय दत्तने माझ्याबरोबर दहा मिनिटे गर्ल्स स्कूल आहे त्या रस्त्यावरुन चालावे अशी मी त्यांना विनंती केली होती. मग मुली मला आणि संजय दत्तला पाहून अगदी वेड्या झाल्या होत्या आणि मला राजासारखे वाटले. ‘

Advertisement

विवेक ओबेरॉय म्हणाले, ‘त्यानंतर माझे वडील व संजय दत्त निघून गेले, पण मी शाळेचा एक मिनी स्टार झालो होतो. एकदा मी संजय दत्तचा चित्रपट पहायला शाळेतून गुपचूप बाहेर पडलो आणि अडकलोहोतो . ”विवेक ओबेरॉय यांनी साथिया, युवा, मस्ती आणि ओमकारा सारख्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement