Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

भारताचे वॉरन बफे समजले जाणारे दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्यासह 10 जणांना ‘ते’ प्रकरण भोवले ; सेबीने तब्बल 37 कोटी रुपये वसूल केले; वाचा काय आहे हे प्रकरण

0 45

MHLive24 टीम, 16 जुलै 2021 :-  शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यासह एकूण 10 जणांना 37 कोटी दंड भरुन आपटेक इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणात सेबीसोबत समझोता करावा लागला आहे. या सर्व लोकांनी या प्रकरणात सेटलमेंट फी म्हणून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) 37 कोटी रुपये दिले आहेत. हे प्रकरण 2016 मधील आहे.

हे प्रकरण एपटेकच्या शेअर्समधील राकेश झुनझुनवाला आणि त्याच्या कुटुंबाच्या व्यापाराशी संबंधित आहे. हे लोक एजुकेशन कंपनी एपटेकमध्ये प्रमोटर होते. या लोकांना अप्रकाशित कीमत संवेदी सूचना (UPSI) मिळाल्याचा आरोप होता अन सेबी याचाच तपास करीत होती. मे आणि ऑक्टोबर 2016 च्या दरम्यान सेबी सर्व प्रकारच्या अंतर्गत व्यवहारांची चौकशी करत आहे.

Advertisement

काय आहे प्रकरण :- सविस्तर आदेश मध्ये सेबीने सांगितले की 7 सप्टेंबर, 2016 रोजी एपटेक लिमिटेडने मार्केट बंद झाल्यानंतर ‘एपटेक प्री-स्कूल सेगमेंटमध्ये उतरत आहे’ या नावाने शेअर बाजारात घोषणा केली. ही माहिती अप्रकाशित किंमत संंवेदी सूचना (UPSI) मानली जाते.

उत्पल सेठ आणि राकेश झुंझुनवाला यांना याविषयी आधीच माहिती होती असा आरोप होता आणि त्यांनी इतर अनेक अर्जदारांना माहिती दिली. सेबी म्हणाले, “या माहितीच्या आधारे राकेश झुनझुनवाला, रेखा झुनझुनवाला, राजेशकुमार झुनझुनवाला, सुशीला देवी गुप्ता, सुधा गुप्ता आणि उष्मा सेठ सुळे यांनी एपटेक चे शेअर्स खरेदी केले.”

Advertisement

राकेश झुंझुनवालाने किती दिले ? :- एकूण सेटलमेंटपैकी राकेश झुनझुनवाला यांना 18. 5 कोटी आणि त्यांच्या पत्नीला 3.2 कोटी रुपये द्यावे लागले. गेल्या महिन्यात राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबियांनी अपील केले होते कि ते एपटेक शेअर्सच्या इनसाइडर ट्रेडिंगच्या प्रकरणी सेटलमेंट करायची आहे, असे आवाहन केले होते. झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची एपटेक मध्ये सुमारे 49 टक्के हिस्सेदारी आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement