Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आता पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर ‘ह्यावर’ चालतील वाहने; मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितला प्लॅन

0 46

MHLive24 टीम, 18 जुलै 2021 :- इंधन म्हणून वाहनांमध्ये फक्त इथेनॉल वापरण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, 2023-24 पर्यंत पेट्रोलसह 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे आणि अंतिम लक्ष्य 100 टक्के इथेनॉलने वाहने चालवणे हे आहे.

CII आयोजित आत्मनिर्भर भारत परिषदेला संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, रिन्यएबल ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू, ज्याच्या मदतीने पेट्रोलऐवजी 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावतील.

Advertisement

ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे त्यांना आवाहन आहे की त्यांनी केवळ सौर उर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जीच्या मदतीने आपली कार रिचार्ज करावी. यासाठी भविष्यात चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.

गोयल म्हणाले की, 2020 पर्यंत रिन्यूएबल एनर्जीचे लक्ष्य 175 गीगाव्हॅट निश्चित केले गेले आहे, तर 2030 पर्यंत रिन्यूएबल एनर्जी लक्ष्य 450 गीगाव्हॅट आहे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन 2021 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 ते 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिक्सिंगचे लक्ष्य ठेवले केले.

Advertisement

सध्या इथेनॉल मिश्रण 8.5 टक्के :- तत्पूर्वी सरकारने 2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष्य पाच वर्षांपूर्वी शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या देशात पेट्रोलमध्ये जवळपास 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. वर्ष 2014 मध्ये ते केवळ 1-1.5 टक्क्यांच्या दरम्यान होते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement