Vaccination of children : जाणून घ्या केव्हा मिळेल तुमच्या घरातील मुलांना कोरोनाची लस

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :- कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.”शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस ड्रायव्हर अशा व्यक्ती ज्या मुलांच्या संपर्कात येतात. त्यांचं लसीकरण करणं महत्त्वाचं आहे.(Vaccination of children)

देशात कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेमध्ये, वृद्ध आणि 45 वर्षांवरील लोकांनंतर, 18 वर्षे वय ओलांडलेल्या सर्व लोकांचे लसीकरण केले जात आहे.

पण, अद्याप किशोरवयीन आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आलेली नाही. पण, आता लवकरच लहान मुलांनाही कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

लहान मुलांच्या कोविड लसीकरणाबाबत, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मध्ये कोविड-19 साठी राष्ट्रीय टास्क फोर्सच्या ऑपरेशनल रिसर्च ग्रुपचे डॉ. एन के अरोरा म्हणतात की, देशात एकूण 44 कोटी मुले आहेत.

त्यापैकी 12 वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर 12 ते 17 वयोगटातील एकूण 12 कोटी मुले आहेत. सध्या झायकोव्ह डी(ZyCoV-D) लसीला या वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी भारतात मान्यता देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात किशोरवयीन मुलांना लस मिळण्याची शक्यता आहे.

डॉ.अरोरा म्हणाले की, देशातील 32 कोटी मुले 12 वर्षाखालील आहेत. ज्यात दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची संख्या मोठी आहे. सध्या दोन वर्षांखालील मुलांना कोरोना लसीकरणात समाविष्ट केले जाणार नाही.

Advertisement

भारत बायोटेकसह इतर अनेक लसींच्या चाचण्यांच्या निकालांनंतर ऑक्टोबरपर्यंत किशोरवयीन गटाचे लसीकरण सुरु होईल. तसेच, 2022 च्या जानेवारी ते मार्च दरम्यान दोन वर्ष ते 12 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker