Google Pay वापरता ना? मग हि बातमी वाचाच

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- सध्या सर्वच लोक डिजिटल पेमेंटची पद्धत वापरतात. जमाना ऑनलाईन झाला आहे. यात Google Pay चा जास्त प्रमाणात वापर केला जातो. आता आणखी एक उत्कृष्ट फिचर Google Pay ने जोडले आहे.(Google Pay)

आता डिजिटल पेमेंट कंपनी Google Pay ने आपल्या अॅपवर ‘स्पीच टू टेक्स्ट फीचर’चा पर्याय समाविष्ट केला आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार बोलून करू शकतात. ही सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

Google Pay तुमच्या भाषेत चालेल

Advertisement

PhonePe, Paytm आणि Amazon Pay शी स्पर्धा करणारे Google Pay सांगते की, या श्रेणीतील आणि जागतिक लेबलवर हे Google चे नवीन फीचर्स आहे. यासोबतच अॅप्लिकेशनमध्ये पसंतीची भाषा म्हणून ‘हिंग्लिश’ हा पर्यायही जोडण्यात आला आहे.

बोलून खाते क्रमांक टाइप करा

नवीन अपडेटनंतर, जेव्हा एखाद्या वापरकर्त्याला दुसर्‍या वापरकर्त्याचा खाते क्रमांक टाइप करावा लागतो, तेव्हा स्पीच-टू-टेक्स्ट फीचरच्या मदतीने हे काम बोलूनही करता येते.

Advertisement

बोलून खाते क्रमांक टाइप केल्यानंतर वापरकर्ता त्या खाते क्रमांकाची पुष्टी करेल. कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची प्रक्रिया वापरकर्त्याकडून खात्री मिळाल्यानंतरच होईल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker