Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कर बचत करणाऱ्या एफडींवर ‘ह्या’ बँकांमध्ये मिळतेय 6.75% पर्यंत व्याज; पहा लिस्ट

0 5

MHLive24 टीम, 24 जून 2021 :-  कर बचतीसाठी एफडी हा एक अतिशय लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. टॅक्स सेव्हर एफडीमध्ये 5 वर्षाचा कालावधी असतो. या एफडीमध्ये केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकते.

टॅक्स सेव्हर एफडीवर चांगल्या रिटर्नबद्दल जर आपण पहिले तर, देशातील काही बँका टॅक्स सेव्हर एफडीवर वार्षिक 6.75 टक्क्यांपर्यंत चांगला रिटर्न देत आहेत. टॅक्स सेव्हर एफडी वर कोणती बॅंक जास्तीत जास्त फायदा देत आहेत ते जाणून घ्या…

Advertisement

या सरकारी बँक आहेत अव्वल 

 • युनियन बँकः या बँकेतील टॅक्स सेव्हर एफडी वरील व्याज दर वार्षिक 5.55 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.05 टक्के आहे.
 • कॅनरा बँकः येथे टॅक्स सेव्हर एफडीवरील वार्षिक व्याज दर 5.50 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6% आहे.
 • बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँक: या दोन्ही बँकांमधील टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 5.30 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5.80 टक्के आहे.
 • एसबीआयः टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 5.40 टक्के आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.20 टक्के आहे.

खाजगी बँकांमध्ये कोण उत्तम रिटर्न देत आहे ? 

Advertisement
 • येस बँकः टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6.50 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.25% आहे.
 • आरबीएल बँक आणि डीसीबी बँक: टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6.50 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7 टक्के आहे.
 • इंडसइंड बँकः येथे टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.50 टक्के आहे.
 • करूर वैश्य बँक: येथे टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6 टक्के आहे.

स्मॉल फाइनेंस बँकांमध्ये कोण उत्तम रिटर्न देत आहे ? 

 • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जिवान स्मॉल फायनान्स बँकः येथे टॅक्स सेव्हर एफडीवरील वरील व्याज दर वार्षिक 6.75 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.25% आहे.
 • जना स्मॉल फायनान्स बँक: टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6.50 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7 टक्के आहे.
 • सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक: येथे टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6.25 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.50 टक्के आहे.
 • इक्विटास स्मॉल फायनान्स बँक: टॅक्स सेव्हर एफडीवरील व्याज दर वार्षिक 6.25 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.75 टक्के आहे.

 

Advertisement
 • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
 •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit