Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

युनिक बिझनेस आयडिया; एकदा सुरु केल्यास लाइफटाइम कमवाल

0 139

MHLive24 टीम, 20 जुलै 2021 :- व्यवसाय करताना तुमच्याकडे भांडवल किती आहे यांवरून काही न ठरवता कोणता बिझिनेस करायचा हे इतर काही बाबींवर ठरवावं. त्यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथल्या समाजाची गरज. तुम्ही जो काही बिझिनेस सुरू कराल व जे काही ग्राहकांना देणार असाल त्याची मुळात गरज असावी, तरंच त्याची विक्री होईल.

बरेच वेळेस विक्री तपासण्याआधी उत्पादन बघितलं जातं. सर्वात प्रथम विक्री तपासावी. आपण एकतर सेवा पुरवाल किंवा एखादे उत्पादन पुरवाल. यांतील जे काही असेल त्याची गरज नसेल तर तुमचा व्यवसाय पहील्यांच दिवशी बंद पडलेला असेल.

Advertisement

या ठिकाणी आम्ही कमी पैशांमध्ये अधिक नफा मिळवून देणारा एक व्यवसाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या व्यवसायासाठी खास कंपनीकडून ट्रेनिंगही दिलं जातं. त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही नेमकं काय करणं आवश्यक आहे पाहा.

नॅशनल स्‍मॉल इंडस्‍ट्रीज कॉरपोरेशन च्या इन्‍क्‍यूबेशन प्रोग्रामनुसार सोया मिल्क तयार करण्याचा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे. या व्यवसायाचे खास ट्रेनिंग तुम्हाला देण्य़ात येईल. या व्यवसायासाठी तुम्ही सरकारी योजनेतून कर्ज घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्य़ाजवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये आहेत तर तुम्ही सोया मिल्क मेकिंग यूनिट सुरू करू शकता.

Advertisement

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ प्रशिक्षण देईल :- नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशनने (एनएसआयसी) देशातील विविध भागात तांत्रिक सेवा केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे विविध प्रकारचे व्यवसाय तसेच नोकरीभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देतात. यामध्ये तुम्हाला सोया दूध बनविण्याचे पूर्ण प्रशिक्षणही मिळेल. तसेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (ईडीपी) अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यापासून व्यवसाय व्यवस्थापन, विपणन प्रशिक्षण देखील उपलब्ध असेल.

उत्पादन खर्च :- NSIC च्या अहवालानुसार सोया मिल्क मेकिंग यूनिटसाठी एकूण 11 लाख रुपये खर्च येतो. मात्र सुरुवातीला तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही मुद्रा योजनेतून बँक लोन घेऊ शकता. बँकेकडून तुम्हाला जवळपास 80 टक्के कर्ज मिळेल तुम्हाला वरचा दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च काढायचा आहे.

Advertisement

किती जागा लागेल :- एनएसआयसीच्या अहवालानुसार, सोया दुधाचे एक छोटेसे युनिट स्थापित करण्यासाठी 100 चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. यामध्ये, संरक्षित क्षेत्र केवळ 75 चौरस मीटर आहे. हे भाड्याने देखील घेतले जाऊ शकते. परंतु जर मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर त्यानुसार जागा लागेल.

किती होईल कमाई :- या संपूर्ण सेटअपमध्ये साधारण तुम्ही 1 लाख 75 हजार लीटर सोया मिल्क तयार करू शकता. प्रत्येक लिटरमागे 30 रुपये खर्च होऊ शकतो. सगळा खर्च बाजूला काढून तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंत वर्षाला कमाई होऊ शकते. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही http://www.nsic.co.in/NTSC/Main.aspx संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit