Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

युनिक बिजनेस आयडिया; बदक पालन करा अन हजारो कमवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 17

MHLive24 टीम, 12 जुलै 2021 :- बदक पालन व्यवसाय हा महाराष्ट्रातला एक उपेक्षित व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कोंबडी पालनाचा व्यवसाय चांगल्यापैकी मूळ धरायला लागला आहे. परंतु बदक पालनाच्या बाबतीत अजून म्हणावी तेवढी जागृती निर्माण झालेली नाही.

बदक पालन हा व्यवसाय पु्र्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडुमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात त्यांच्याकडे अशणा-या बदकांची संख्या ८ ते १० असुन ती मोकाट सोडलेली असतात व वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देतात.

Advertisement

परंतू हाच व्यवसाय शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करुन केला तर त्यात बराच फायदा होतो. महाराष्ट्रात कोकण हा भाग बदक पालनासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यातही बदक पालन करायला काही हरकत नाही.

बदक पालनातून आपल्याला रोजगारासह आपल्याला चांगला पैसा मिळत असतो. या व्यवसायात कुक्कुटपालनपेक्षा कमी धोका असतो. बदकच्या मांस आणि अंड्यामध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती असते.

Advertisement

कोंबड्यापेक्षा बदकांच्या मांसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते शिवाय बदकाचे मांस आणि अंडी प्रथिने समृद्ध असतात. मग अधिक नफा आणि अधिक प्रोटिनसाठी बदक पालन व्यवसाय करायलाच हवा. यासाठी आपण आज बदक पालनाविषयी माहिती घेणार आहोत.

अशी करा सुरुवात :- बदक पालन करण्यासाठी आपल्याला चांगली शांत जागा निवडावी लागते. यासाठी जर तलावाशेजारी जर मिळाली तर अती उत्तम. पण जर बदक पालनाच्या ठिकाणी काही जलाशय नसला तरी काही हरकत नाही कारण आपण कृत्रिम पद्धतीचा तलाव, किंवा तळे बनवू शकतो.

Advertisement

जर तलाव किंवा तळे खोदण्यासाठी पुरेसा पैसा आपल्याकडे नसला तर आपण आपल्या शेतातील टीनशेड मध्ये चहूबाजूंनी २ते ३ फुट खोल आणि रुंद तळे बनवू शकता. या टीनशेडमध्येही बदक राहू शकतात. एका बदकाला पाळण्यासाठी दीड वर्ग फूट जमिनीची आवश्यकता असते.

बदकांचा आहार – बदकांना प्रॉटिन असलेले अन्न अधिक द्यावे. बदकाच्या पिल्लांना २२ टक्के या प्रमाणात प्रॉटिन देणे आवश्यक असते. कोंबड्यांपेक्षा याचा खर्च १-२ टक्क्यांनी कमी असतो.

Advertisement

जलाशयाचा आकार – हा पाळावयाच्या बदकांच्या संख्येनुसार ठरवावा. तसेच घरांचा आणि जाळीच्या कुंपणाने बंद केलेल्या घरट्याचा आकार ठरवताना सुद्धा तो बदकाच्या संख्येनुसार असावा. बदक पालनाचे सगळ्यात मोठे पथ्य म्हणजे नियमित पाणी पुरवठा, हिरवे गवत यांची उपलब्धता असावी.

बदकांच्या पिलांचे संगोपन काळजीपूर्वक करावे लागते. त्यांच्या वाढीच्या काळामध्ये काही विशिष्ट तपमान असणे आवश्यक असते. पहिल्या महिन्यामध्ये ते २८ ते ३२ अंश सेल्सियस असावे. नंतरच्या काळात ते हळु हळु कमी केले तरी चालते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit