Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

युनिक बिझनेस: पेट्रोल-डिझेलची होम डिलीवरी बक्कळ कमाईचा मार्ग, जाणून घ्या…

0 6

MHLive24 टीम, 13 जुलै 2021 :- उद्योग म्हटलं की ठराविक प्रांतातील लोक डोळ्यासमोर येतात. मराठी माणसांची टक्केवारी त्यात तशी कमीच दिसते. तरीही महाराष्ट्रात वेगळा विचार करून उद्योग करणारे लोक आहेतच की. आणि सध्याचा काळ पाहिला तर विशेषतः तरुण पिढीने स्टार्ट अप बिझिनेस कल्पना प्रत्यक्षात आणणं गरजेचं आहे.

त्यासाठी अर्थात कष्ट हवेत, फक्त ९ ते ५ कामाची वेळ हा दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागणार, कामात चिकाटी हवी, कामात रिस्क घ्यायची तयारी हवी आणि अशा अनेक गोष्टी असतात. फक्त तयारीनिशी स्वतःला झोकून देणं महत्वाचं असतं. अडथळे आले, अडचणी आल्या तरी न खचता प्रयत्न करत राहीलं पाहिजे, लोकांशी चांगला संपर्क ठेवणंही महत्वाचं.

Advertisement

जर तुम्हालाही कोणता बिझनेस सुरु करायचा असेल तर ऑनलाईन फ्यूल विकून कोट्यवधीची कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, पेट्रोलियम प्रोसेस इंजिनिअरींग सर्व्हिससारख्या तेल कंपन्या मदत करतील. त्याशिवाय तुम्ही सरकारचीही मदत घेऊ शकता.

यासाठी स्टार्टअप कंपनी पेपफ्यूल डॉट कॉम कंपनीने सांगितल्याप्रमाणे कसं तुम्ही डोर टू डोर फ्यूल विकण्याचा व्यवसाय करू शकता हे पुढे जाणून घेऊया. पेपफ्यूल डॉट कॉम सरकारद्वारे मान्यता प्राप्त स्टार्टअप आहे. पेपफ्यूल्सचं इंडियन ऑयल कंपनीसोबत थर्ड पार्टी करार आहे. हे डोर-टू-डोर फ्यूल डिलीवरी करण्याचं काम करतात.

Advertisement

यावर तुम्ही ऑनलाईन मेसेज करून ऑर्डर करू शकता. नोएडाच्या टिकेंद्र, प्रतीक आणि संदीप या तीन तरूणांनी मिळून अशाप्रकारे स्टार्टअप सुरू केला आहे. व्यवसाय सुरु केल्यानंतर काही वर्षातच यांच्या कंपनीचा टर्नओवर १०० कोटींच्या आसपास पोहचला आहे.

अशीच आणखी एक कहाणी आहे चेतन वाळुंज आणि अदिती भोसले यांची. वाळुंज व अदितीने फॉरेन्सिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. तर चेतनने आपल्या घरचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे. लग्नानंतर दोघांनीही व्यवसायात लक्ष द्यायचं ठरवलं.

Advertisement

उद्योगी स्वभाव असल्यामुळे वेगळं काहीतरी करायचं असा सतत विचार चालायचा. पण नेमकं काय करावं हे काही सुचत नव्हतं. आपल्या पेट्रोल पंपाच्या व्यवसायाला अनुसरून एक वेगळी कल्पना त्यांना सुचली. ‘रिपोज एनर्जी’ या नावाखाली त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडित डेड मायलेज ही समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला.

त्यातूनच व्यवसायाला एक वेगळं वळण मिळालं. ट्रान्सपोर्ट व्यवसायात गाडीत इंधन भरायचं म्हटलं की पेट्रोल पंपापर्यंत गाडी आणावी लागते. त्यात वेळ, पैसा आणि उरलंसुरलं इंधनही खर्च होतं. शिवाय प्रदूषण होतं ते वेगळच. नेमकी हीच समस्या भोसले दांपत्याने हेरली. उपाय म्हणून डिझेलची होम डिलिव्हरी करण्याचा अफलातून निर्णय घेतला.

Advertisement

अर्थात असं इंधन होम डिलिव्हरी करणं म्हणजे रिस्क आलीच. तरीही हे धाडस करायचं त्यांनी ठरवलं. त्यांच्या मते, भारतात दररोज २७ करोड लिटर डिझेलचा वापर होतो. त्यापैकी ५-१०% डिझेल हे डेड मायलेज मध्ये वाया जातं. डिझेलची होम डिलिव्हरी करायची तर ती सुरक्षितपणे व्हायला हवी.

त्यासाठी सुरक्षित साधनं हवी. त्यादृष्टीने शोध सुरू झाला. आर. एम. पी. पी. म्हणजेच ‘रिपोज मोबाईल पेट्रोल पंप’ सुरू करण्यापूर्वी त्यांनी डिझेलच्या सुरक्षित होम डिलिव्हरीसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांशी संपर्क साधला. पाहता पाहता या दांपत्याची धडपड खुद्द रतन टाटांना समजली.

Advertisement

भोसले दांपत्याने हाती घेतलेल्या कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी रतन टाटांनी त्यांना बोलावलं. आपल्या कामासंदर्भात इतक्या मोठ्या व्यक्तीशी चर्चा करायची म्हणजे हाती घेतलेल्या कामाचं स्वप्न पूर्ण होण्याची ही नांदी आहे, हे त्यांनी ओळखलं.

रतन टाटांनी भोसले दांपत्याच्या उपक्रमासाठी मेंटरशिप देण्याचं आश्वासन दिलं. तेव्हापासून रिपोज फर्म टाटा मोटर्स आणि इतर प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांबरोबर काम करत आहे. रिपोजने अलिकडेच डबल डिस्पेंसर मोबाईल पेट्रोल पंप सुरू केला आहे.

Advertisement

जिथे आधुनिक पद्धतीने सुरक्षितता विचारात घेतली आहे. दोन उच्च गतीचे डिस्पेंसर, loT controller, ब्रेक इंटरलॉक सिस्टिम, जिओ फेंसिंग, फ्युल सेंसर अशी संसाधने वापरून आधुनिकता आणली आहे. त्यांच्या कंपनीने ‘रिपोज मोबाईल पेट्रोल पंप’साठी तीन पेटंट रजिस्टर केले आहेत.

कंपनी सध्याच्या उपलबधतेप्रमाणे ३० मिलियन डॉलर्स फंड गोळा करून आर एम. पी. पी. चे ३५०० युनिट विकण्यासाठी तयार आहे. इंधनाचं सुलभ वितरण होण्यासाठी Vo Alfa सिस्टिमचं संशोधन करण्यात आलं. यामधे फायर सेफ्टीचा मुख्य विचार केला आहे.

Advertisement

इंधनाच्या सुरक्षित वितरणासाठी अशा गोष्टी खुप महत्वाच्या ठरतील यात शंकाच नाही. कोविड लॉकडाऊनच्या काळात भोसले दांपत्याने सुरक्षित आणि यशस्वीपणे डिझेलची होम डिलिव्हरी केली. इतक्या कठीण प्रसंगात माणसांना घराबाहेर पडणं अवघड असताना डिझेलची सुरक्षित होम डिलिव्हरी करून कित्येकांचं काम भोसले दांपत्याने सुकर केलं. इतकंच नाही तर त्यांच्या कामाचं महत्त्व त्यांनी काम करून पटवून दिलं.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement