Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

टेकडीची माती खचून दोन घरं कोसळली

0 51

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- चेंबूर, विक्रोळी आणि कळव्याच्या घटनेमुळे डोंगर,दरडीच्या पायथ्याशी असलेली धोकादायक घरे खाली केल्यामुळे उल्हासनगरमध्ये पावसाने टेकडी खचून धरे कोसळली, तरी जीवितहानी झाली नाही.

घरे आधीच रिकामी

Advertisement

मुसळधार पावसामुळे टेकडीची माती खचून दोन घरं कोसळल्याची घटना उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात घडली आहे. सुदैवानं ही दोन्ही घरं आधीच रिकामी केलेली असल्याने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील धोबीघाट परिसरात टेकडीवर दाटीवाटीने घरं बांधण्यात आली आहेत.

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या टेकडीची माती खचली आणि या भागातली दोन घरं कोसळली. सुदैवानं रहिवाशांच्या ही बाब आधीच लक्षात आलेली असल्यामुळे त्यांनी घरं रिकामी केली होती. त्यामुळे घरं कोसळून कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

टेकडीला रिटर्निंग वॉल बांधावी

मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती खचण्याच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे धोबी घाट परिसरातील या टेकडीला रिटर्निंग वॉल बांधावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून केली जात आहे; मात्र उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातंय.

Advertisement

घरं रिकामी न केल्यास तुम्हीच जबाबदार

टेकडीवरील दोन घरं कोसळल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेनं या भागातील रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या. तसंच घरं रिकामी न केल्यास कुठलीही दुर्घटना घडली, तर त्याला आपणच जबाबदार असाल, असा इशारा दिला. महानगरपालिकेनं या रहिवाशांची व्यवस्था जवळच्याच एका शाळेत करण्याची तयारी दर्शवली होती.

Advertisement