दैनंदिन वापरातील हळद तुमच्या आयुष्याला देईल जबरदस्त आर्थिक कलाटणी; पैसे कमावण्यासाठी वाचा संपूर्ण आर्टिकल…

MHLive24 टीम, 06 जुलै 2021 :- अनेक लोक सध्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार झाले आहेत. त्यातील बऱ्याच लोकांना आता नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा अशी अपेक्षा आहे. अशा लोकांनी जर दैनंदिन वापरातील लागणारी हळद जी आहे तिच्या संदर्भात व्यवसाय सुरु केला तर आपण नक्कीच लाखो रुपये कमवाल.

भारत हा हळद पिकवणारा एक प्रमुख देश आहे. हळद हे एक मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पिक म्हणून प्रचलित आहे. प्रतिवर्षी २५ लाख प्रती टन मसाले पिकाचे उत्पादन होते. भारतातील अनेक राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.
जगातील एकूण उत्पादनापैकी ७६% हलद भारतात होते. महाराष्ट्रात अंदाजे १, १२, ४७२ हेक्टर क्षेत्रावर मसाले पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हात हळदीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.

Advertisement

हळदीमधून भरभराट केलेल्या काही व्यक्तींचे दाखले आपण याठिकाणी पाहुयात :- पहिले उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्‍यातील माटोडा गावच्या राजेश चोपडे यांनी हळद प्रक्रिया उद्योगात भरारी घेतली आहे. पावडरनिर्मिती, लोणचे आदी पदार्थांची विविध प्रदर्शने व थेट विक्री करीत या व्यवसायात त्यांनी जम बसवला आहे.

हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनात राजेश यांना हळद पिकाची प्रेरणा मिळाली. उत्पादकता व उत्पन्नाचा ताळेबंद समाधानकारक वाटल्यानंतर 2004 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक एकरावर लागवड केली. पीक व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात केले.

Advertisement

मार्केटिंग व विक्री

 • एक किलो हळकुंडापासून सुमारे 950 ग्रॅम हळद पावडर मिळते.
 • हळकुंड किंमत, कांडप, पॅकिंग, लेबल आदी धरून एक किलो पावडरनिर्मितीसाठी 89 रुपये खर्च होतो.
 • राज्यात ठिकठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनांसह धान्य महोत्सवांच्या माध्यमातून ते आपल्या उत्पादनांची विक्री करतात.
 • वर्षभरात सुमारे 20 ते 25 कृषी प्रदर्शने, तर 30 हून अधिक धान्य महोत्सवांत भाग घेतला जातो.
 • सरासरी पाच दिवसांच्या मोठ्या शहरांतील प्रदर्शनात पाच क्विंटलपर्यंत पावडरची विक्री होते.
 • प्रदर्शनातून 160 रुपये प्रति किलो दराने पावडरची विक्री होते.
 • हळद पावडर विक्रीतून चांगले अर्थार्जन होत असल्याचे पाहून राजेश यांचा उत्साह वाढीस लागला.
 • त्यानंतर त्यांनी हळदीचे अन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री सुरू केली.
 • हळदीचे लोणचे 200 ग्रॅम पॅकिंगमधून 50 रुपयांना विकले जाते.
 • ओली हळद मागणीनुसार किलोला शंभर रुपयांनी विकली जाते.
 • गेल्या वर्षी दहा क्‍विंटल हळद लोणचे विक्री झाले, त्यासाठीही पॅकिंगचा पर्याय अवलंबिला आहे.

दुसरे उदाहरण पाहायचे झाल्यास ,परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात युवा शेतकरी आनंद शिनगारे यांनी हळद प्रक्रिया उद्योगाची संधी शोधली. विविध बाजारपेठांचा अभ्यास केला. गुणवत्ता प्रधान उत्पादनावर भर दिला. त्यातून उद्योगाचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला. पुणे, मुंबई अशा शहरात त्यांनी आपल्या हळदीच्या ब्रॅण्डची ओळख तयार केली आहे. वर्षला एकहजार हून अधिक क्विंटल विक्री व ८० लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्याची क्षमता त्यांनी तयार केली आहे.

Advertisement

बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आनंद यांनी शेतीसोबत भुसार मालाचा व्यवसाय सुरु केला. स्थानिक परिसर तसेच शेजारील हिंगोली जिल्ह्यात कच्चा माल (हळद) उपलब्ध होत असल्याने गावात हळद पावडर निर्मितीचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून ते हळद खरेदी करीत. गावातील गिरणीमधून पावडर तयार करून गाव परिसरात त्याची विक्री करीत. ग्राहकांना उत्तम क्वालिटी दिल्याने पावडरीला मागणी वाढू लागली.

सन २०१७ मध्ये ४० हजार रुपये खर्च करून छोटी गिरणी खरेदी करून हळद पावडर निर्मितीची क्षमता वाढवली. दररोज सुमारे पाच क्विंटल पावडर तयार व्हायची. पुणे येथील एका मसाले कंपनीला पाठविलेली पावडर पसंतीस उतरल्यानंतर नियमित मागणी सुरू झाली. मग मुंबई, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणांहूनही विचारणा होऊ लागली. उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
 • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
 • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup