Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

सकाळी चहा-कॉफी पिण्याएवजी ट्राय करा हे ड्रिंक होतील जबरदस्त फायदे !

0

MHLive24 टीम, 4 जून 2021 :- आपल्यापैकी बर्याच जणांना दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. आणि जे लोक सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतात त्यांच्या मते चहा कॉफी प्यायल्यानंतर त्यांना फ्रेश वाटतं, शरीरात ऊर्जा येते व आपल्या दिवसभराच्या कामासाठी तयार झालो आहोत.

जरी आपली चहा-कॉफीचे सेवन केल्याने दिवसाची सुरुवात ही चांगली होत असेल, तरी दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

Advertisement

यामुळे पोटाच्या बाबतच्या समस्या तुम्हाला जडू शकतात, तुमचे वजन वाढू शकतं. मग आता तुम्ही विचार कराल की दररोज सकाळी चहा-कॉफी प्यायची नाहीतर नेमकं काय प्यायचं ? याचं उत्तर आहे जिऱ्याचं पाणी.

जिऱ्याचं पाणी सकाळी प्यायल्याने पोटाच्या बाबत असणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.

Advertisement

दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात

असे बनवा जिऱ्याचं पाणी :- तांब्याच्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्या व त्यामध्ये एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा. आणि सकाळी हे पाणी गाळून घेऊन प्या.

Advertisement

जिऱ्याचं पाणी हे लाईट ड्रिंक आहे, त्यामुळे चहा-कॉफीऐवजी सकाळी हे पाणी प्यायल्यात तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभर तुम्ही अॅक्टिव्ह राहाल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement