Truck drivers salary with bonus : काय सांगता ! ‘येथील’ ट्रक चालकांना आहे 73 लाख रुपये पगार, सोबत बोनस देखील

MHLive24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- महामार्ग आणि धोकादायक टेकड्यांमधून देशाच्या विविध भागांत माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकांचा पगार किती आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका अंदाजानुसार, भारतात ट्रक चालकांचे मासिक उत्पन्न 30000 रुपये आहे.(Truck drivers salary with bonus)

आजच्या महागाईच्या मानाने हे खूप कमी वाटू शकते. पण असा एक देश आहे जिथे ड्रायव्हर्स भारतामधील इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमाई करत आहेत. होय ही फेक न्यूज नाही. यूके मधील ट्रक चालक दरमहा लाखो रुपये कमवतात.

सुपरमार्केटचे ट्रक ड्राइवर

Advertisement

भारतातील अभियंते किंवा डॉक्टरांसारखे व्यावसायिकसुद्धा यूकेमधील सुपरमार्केट ट्रक चालकांइतके पैसे कमवत नाहीत. यूके सुपरमार्केटमध्ये माल पोहोचवणारे ट्रक चालक भारताच्या उच्च उत्पन्न श्रेणीतील लोकांइतकेच कमावतात. या लोकांचे वार्षिक वेतन त्यांच्या चलनात 70,000 पौंड आहे, जे भारतात 70,88,515 रुपये आहे.

बोनस मिळतो

हे यूके ट्रक ड्रायव्हर्स वार्षिक सुमारे 71 लाख रुपये कमवतात आणि त्यांना बोनस देखील मिळतो. या चालकांना 2000 पाउंड बोनस म्हणून मिळतात. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 2,02,612 रुपये आहे. म्हणजेच, अशा प्रकारे, यूके ट्रक ड्रायव्हर्स सहजपणे वार्षिक 73 लाख रुपयांपर्यंत कमावतात.

Advertisement

पगार इतका जास्त का आहे ?

टेस्को आणि सेन्सबरी सारखे नियोक्ते आणि या कंपन्या ट्रक चालकांना भरमसाठ पगार देत आहेत. खरं तर यूकेमध्ये सध्या राष्ट्रीय पातळीवर 100,000 ड्रायव्हर्सची कमतरता आहे. या कमतरतेमुळे ट्रक चालकांना जास्त पगार देऊ केला जात आहे. सुपरमार्केटमध्ये स्टॉक ठेवण्यासाठी अनुभवी चालकांना हे एक प्रकारचे आमिष दिले जात आहे. पण याचा थेट फायदा ट्रकचालकांना होतो.

2 वर्षांचा करार

Advertisement

17 वर्षांपासून ड्रायव्हिंग करणाऱ्या यूकेच्या ट्रक ड्रायव्हरने दावा केला आहे की एजंट्सकडून दोन वर्षांचा करार आणि त्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी £ 2,000 बोनस देण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे एजंटने स्वतः ड्रायव्हरशी संपर्क साधला होता. ड्युटी आठवड्यातून पाच रात्री होती, तर शनिवारसाठी दीडपट आणि रविवारी दुप्पट पेमेंट दिले जात असे सांगितले.

बॉसपेक्षा जास्त कमावणारा ड्रायव्हर

ट्रक चालकाच्या मते, हा पगार अतिशय धक्कादायक आहे. याचे कारण असे की त्याचे बॉस स्वतः देखील तेवढे कमावत नाहीत. कंपन्या सध्या सुपरमार्केटमध्ये वीकेंडला डिलीवरी करण्यासाठी ड्रायव्हर्स शोधत आहेत. या कंपन्यांसाठी पैशांचे फारसे मूल्य नाही.

Advertisement

जुलैमध्ये टेस्को सप्टेंबरअखेर कंपनीत सामील झालेल्या लॉरी चालकांना 1,000 युरोचा बोनस देखील देत होता. परंतु यूकेमध्ये, ट्रक चालकांच्या अशा पगारामुळे ग्राहकांसाठी किंमत वाढीचा इशारा देखील देण्यात आला आहे. म्हणजेच सामान्य जनतेवर याचे ओझे पडू शकते.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker