जबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त !

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :-  देशात इलेक्ट्रिक वाहनचा ट्रेंड सातत्याने वाढत आहे. याचा फायदा घेण्यासाठी कंपन्या नवीन उत्पादनेही बाजारात आणत आहेत. अलीकडेच ब्रिटीश कंपनी गोजिरोने भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक सायकल (ई-बाईक) आणली आहे. या सायकलची किंमत प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोनपेक्षा कमी आहे. कंपनीने याची किंमत 19,999 रुपये ठेवली आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या ई-बाईकचे नाव स्केलिग लाइट आहे आणि एकदा पूर्ण चार्जिंगनंतर ते 25 किमी पर्यंत प्रवास करू शकते. या ई-बाईकमध्ये 210 डब्ल्यूएच बॅटरी आणि 3 लेवल चा पेडल असिस्ट आहे.

ही ई-बाईक 2.5 तासात पूर्ण चार्ज होईल. या ई-बाईकमध्ये डिस्प्ले कंट्रोल सिस्टम आहे. हे माइल्ड स्टीलपासून बनविलेले आहे. ई-बाईकमध्ये 250 वॅटची मोटर वापरली गेली आहे. ई-बाईक 5,999.70 रुपये देऊन प्री-बुकिंग करता येते.

Advertisement

कोविडमुळे ई-बाईक्स वाढल्या :- कोविडमुळे सार्वजनिक वाहनांची उपलब्धता लक्षणीय घटली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. ते पाहता देशात ई-बाईकचा ट्रेंड वाढला आहे. विशेषत: शहरी भागात ई-बाईक्सचा वापर जास्त केला जात आहे. ई-बाईकच्या वापराने आरोग्यही चांगले राहते.

प्रीमियम ई-बाईक्ससाठी ओळखली जाते ‘गोजिरो’:- गोजीरो ही एक ब्रिटेन ची कंपनी आहे जी इलेक्ट्रिक बाईक्स बनवते. कंपनी प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक्सच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. कंपनीची उत्पादने Amazon सह इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker