Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

एटीएममधून पैसे काढताना ट्रांजेक्शन फेल झाले परंतु खात्यातून पैसे कट झाले ? घाबरू नका, बँक रोज देईल 100 रुपये भरपाई

0 4

MHLive24 टीम, 25 जून 2021 :-  आता बहुतेक सर्वजण एटीएम कार्ड चा वापर करतात. यामुळे जास्त पैसे सोबत ठेवण्याचे टेन्शन राहत नाही. परंतु एटीएमचा व्यवहार करताना अनेकदा खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज येतो, पण हातात पैसे पडलेले नसतात.

एटीएममधील बिघाड किंवा इतर कारणांमुळे असे प्रकार होतात आणि मोठा व्यवहार असेल तर मनात भीती निर्माण होते. शा परिस्थितीत ग्राहक अस्वस्थ होतो आणि बँकेशी संपर्क साधतो, परंतु त्यानंतरही बर्‍याच वेळा पैसे मिळत नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असे काही झाले असेल तर काळजी करू नका.

Advertisement

अशा तक्रारी रोज बँकांमध्ये येतात. चांगली गोष्ट म्हणजे बँक आपल्याला पैसे परत करेल. एटीएम व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना सर्वात अगोदर आरबीआयचा नियम माहित असणं गरजेचं आहे.

एटीएममधून पैसे काढताना, पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण पैसे तुमच्या हातात आले नसतील, तर पैसे निश्चितपणे मिळतील. पण यासाठी काही अटीही आहेत, ज्या लक्षात न ठेवल्यास तुम्ही पैसे गमावू शकता.

Advertisement

एटीएममधून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण हातात पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. बँकेला सुट्टी असेल, तर कस्टमर केअरला फोन लावून माहिती देता येईल. प्रत्येक बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर इंटरनेटवरही सहजपणे मिळू शकेल.

बँका दररोज 100 रुपये भरपाई देतात :- अशा परिस्थितीत बँकेने वजा केलेली रक्कम त्वरित बँकेला परत करावी लागते. जर आपल्या बाबतीत असे घडले असेल किंवा आपल्याला बँकेच्या या नियमांबद्दल माहिती नसेल तर तर जाणून घ्या कि तक्रार दाखल केल्याच्या 7 दिवसांत पैसे परत न झाल्यास बँक आपल्याला दररोज 100 रुपये भरपाई देते. फेल ट्रांजेक्शनच्या बाबतीत 20 सप्टेंबर 2019 पासून आरबीआयचे हे नियम लागू आहेत.

Advertisement

यूपीआई ट्रांजेक्शन फेल झाल्यास काय करावे ? :- तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा डिजिटल व्यवहार करून पैसे परत न मिळाल्यास तुम्ही यूपीआय अ‍ॅपवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री ऑप्शनवर जावे लागेल. येथे आपल्याला रेज डिस्प्यूट वर जावे लागेल. रेज डिस्प्यूट वर आपली तक्रार नोंदवा. आपली तक्रार योग्य असल्यास बँक पैसे परत करेल.

टीएम ट्रांजेक्शन फेल झाल्यास करा ‘हे’ काम :- आपण एटीएममधून ट्रांजेक्‍शन केल्यास आणि ट्रांजेक्‍शन अयशस्वी झाल्यास, बँकांकडून पेनल्टी घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत तक्रार द्यावी लागेल. तुम्हाला तुमची तक्रार बँकेकडे ट्रान्झॅक्शन स्लिप किंवा अकाउंट स्टेटमेंटद्वारे द्यावी लागेल.

Advertisement

या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डाची माहिती बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यास सांगावी लागेल. जर आपले पैसे 7 दिवसांच्या आत परत केले गेले नाहीत तर आपल्याला परिशिष्ट 5 फॉर्म भरावा लागेल. ज्या दिवशी आपण हा फॉर्म भराल त्याच दिवशी आपली पेनल्टी सुरू होईल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement