MHLive24 टीम, 15 मार्च 2022 :- Top 10 Billionaire : जगभरातील श्रीमंत व्यक्तींची नावे जाणून घेण्यासाठी व त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली किंवा किती कमी झाली हे जाणून घेण्यास प्रत्येक हौशी माणूस उत्सुक असतो. आज आम्ही या हौशी माणसांसाठी जगभरातील टॉप टेन बिलिनियरची यादी घेऊन आलो आहोत विशेष म्हणजे यामध्ये दोन भारतीयांचा देखील समावेश आहे.
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतातील दोन्ही उद्योगपती आता जगभरातील अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत पोहोचले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 9व्या तर गौतम अदानी 10व्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी फेसबुक अर्थात मेटा चे सीईओ मार्क झुकरबर्ग 15 व्या स्थानावर आले आहेत.
अब्जाधीशांची संपत्ती
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाला, त्यातून श्रीमंतही सुटू शकले नाहीत. जेव्हा त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्या तेव्हा त्यांची निव्वळ संपत्ती घसरली. जगातील नंबर वन अब्जाधीश एलोन मस्क यांची संपत्ती, ज्यांनी एकेकाळी $300 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती, ती आता केवळ $212 अब्ज आहे.
जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती $200 अब्ज वरून $167.7 बिलियनवर घसरली आहे. त्याचवेळी, एकेकाळी चौथ्या क्रमांकावर असलेला मार्क झुकरबर्ग आता अवघ्या $67 अब्ज संपत्तीसह 15व्या स्थानावर आला आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट आता $194.2 बिलियन वरून $159 बिलियनवर आले आहेत. बिल गेट्स 129.3 अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहेत. वॉरन बफेट $118.9 अब्जसह पाचव्या स्थानावर आहेत. लॅरी पेज आता 104.9 अब्ज डॉलरसह सहाव्या क्रमांकावर आहे. याशिवाय सर्जे ब्रिन, लॅरी एलिसन आणि स्टीव्ह वोल्मर यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
त्याच वेळी, फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार, सोमवारी अदानीची संपत्ती $ 734 दशलक्षने कमी झाली. असे असूनही, तो आता $89.7 बिलियनसह 10 व्या क्रमांकावर आहे, तर मुकेश अंबानी $91.4 अब्ज संपत्तीसह 9व्या स्थानावर आहेत.
- 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
- 🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup