सोने आणखीनच घसरले, एक महिन्याच्या निचांकी स्तरावर;जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

MHLive24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे. (Today’s latest gold prices)

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.4 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 0.9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता.अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.

Advertisement

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम                    22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम                 4,614
8 ग्रॅम                 36,912
10 ग्रॅम               46,140
100 ग्रॅम             4,61,400

Advertisement

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम                 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम              5,034
8 ग्रॅम              40,272
10 ग्रॅम            50,340
100 ग्रॅम          5,03,400

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

Advertisement

शहर           22 कॅरेट             24 कॅरेट
मुंबई           46,070              47,070
पुणे             45,170              48,620
नाशिक        45,170             48,620
अहमदनगर  4,5180             47,440

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker