Health insurance tips : हेल्थ इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवा ही ५ सूत्रे; अन्यथा पैसे गुंतवून देखील होऊ शकते नुकसान !

MHLive24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त भयानक आहे. म्युटंट झालेला हा विषाणू ज्येष्ठांसह तरुणांसाठीही जास्त घातक ठरत असून अनेक जणांना रुग्णालयात भरती व्हावं लागतंय.(Health insurance tips )

त्यामुळे या कठीण काळात एक चांगला आरोग्य विमा काढून आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. जेणे करून आपला दवाखान्यातील खर्च या पॉलिसीमधून उचलले जाईल आणि आपला आर्थिक भार कमी होईल.

पण काही गोष्टी अशा आहेत जेव्हा आपली विमा कंपनी आपल्या उपचारांचा खर्च उचलत नाही. आज आम्ही तुम्हाला आरोग्य विमा घेताना काही मुद्द्यांचे भान राखणे आवश्यक असते. अशा महत्त्वाच्या ५ मुद्द्यांबद्दल माहिती सांगणार आहोत.

Advertisement

१. वेटिंग पिरियड महत्त्वाचा

आरोग्य विमा पॉलिसी घेताना त्या पॉलिसीचा वेटिंग पिरियड लक्षात घ्या. तुमच्या पॉलिसीनुसार तुमच्या वैद्यकीय खर्च किंवा आजारांवरील खर्च कंपनी लगेच देत नाही. पॉलिसी घेतल्यानंतर काही कालावधीनंतरच तुमचा खर्च मंजूर केला जातो. यालाच वेटिंग पिरियड म्हणतात.

पॉलिसी घेतल्यापासून या कालावधीपर्यत कंपनी वैद्यकीय खर्चाचा क्लेम मंजूर करत नाही. हा कालावधी १५ दिवसांपासून ९० दिवसांपर्यतचा असू शकतो. त्यामुळेच ज्या कंपनीचा वेटिंग पिरियड कमी असेल ती पॉलिसी घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

Advertisement

२. क्लेम सेटलमेंट रेशो

प्रत्येक कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो असतो. म्हणजेच प्रत्येक कंपनीने पॉलिसी घेऊन क्लेम केलेल्या किती लोकांचा खर्च मंजूर केला. जेव्हा तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी घेता तेव्हा ज्या कंपनीची ती पॉलिसी आहे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे नक्की पाहा. सेटलमेंट रेशो जास्त असणे फार महत्त्वाचे असते.

जास्त क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे विमा कंपनीने जास्त क्लेमचे पैसे ग्राहकांना दिले आहेत किंवा जास्त क्लेम मंजूर केले आहेत. आयुर्विमा कंपन्या आपल्या वार्षिक अहवालात क्लेम सेटलमेंट रेशोचे आकडे देतात. मागील तीन ते ५ वर्षांचा क्लेम सेटलमेंट रेशो लक्षात घेऊनच पॉलिसी घेतली पाहिजे.

Advertisement

३. पॉलिसीमध्ये कोणकोणत्या खर्चाचा समावेश आहे

आरोग्यविमा पॉलिसी म्हणजे प्रत्येक पॉलिसी सर्व वैद्यकीय खर्च मंजूर करते असे अजिबात नाही. विमा कंपन्या अनेक प्रकारच्या पॉलिसी बाजारात विकत आहेत. प्रत्येक विमा कंपनीचे काही नियम असतात. अर्थात सर्व विमा कंपन्या या आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांखाली आणि नियमांखालीच काम करत असतात.

आरोग्य विमा पॉलिसी घेताना सर्वात आधी लक्षात घ्या की त्यात कोणकोणत्या बाबी कव्हर होणार आहेत. ज्या पॉलिसीमध्ये चाचण्यांचा खर्च आणि अॅम्ब्युलन्सचा खर्च अशा जास्त बाबी कव्हर केल्या जात असतील अशी पॉलिसी घ्यावी.

Advertisement

४. हॉस्पिटलचे पुरेसे नेटवर्क

विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यास आपल्या खिशावर भार येत नाही. आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्या पॉलिसीअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल नेटवर्क कसे आहे हे तपासून घ्या. ज्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटलच्या नेटवर्कची सुविधा दिली जात असेल अशीच पॉलिसी घ्यावी. त्यामुळे तुम्हाला खिशातून खर्च करण्याची वेळ येत नाही. अन्यथा सर्व खर्च आधी स्वत: करावा लागतो आणि मग क्लेम कंपनीकडे पाठवावा लागतो.

५. 24 घंटे भरती होणे गरजेचे

Advertisement

रेग्युलर हेल्थ इंश्योरेंस प्लान केवळ आपल्याला रुग्णालयात दाखल केले तरच आपल्या उपचाराच्या खर्चाची तरतूद करेल. जर आपल्याला 24 तासांपूर्वी डिस्चार्ज दिला असेल तर आपल्याला आपल्या खिशातून रुग्णालयासाठी पैसे द्यावे लागतील.

काही इतर महत्वाच्या गोष्टी 

कोणत्या प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स निवडायला हवा?

Advertisement

तुम्ही कोणता इन्शुरन्स निवडावा हेपूर्णपणे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे. यासह, तुम्ही राहत असलेलं शहर आणि तिथल्या आसपासच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून आहे.

साथीच्या आजारात कुटुंबासाठी कोणती विमा योजना निवडावी?

कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा आरोग्य विमा काढण्यास प्राधान्य द्या. हा विमा जरी कौटुंबिक योजनेचा भाग असला तरी कुटुंबातील प्रत्येकासाठी त्यांची विम्याची स्वातंत्र्य रक्कम असायला हवी. एखादी महामारी अथवा साथीचा रोग आल्यास कुटुंबातील बऱ्याच सदस्यांना रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं अशावेळी फॅमिली प्लॅन्समधील मर्यादांमुळे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker