Awesome charger : अरे बापरे ! आला जबरदस्त चार्जर; एकाच वेळेला अवघ्या काही मिनिटांत तीन स्मार्टफोन होतील चार्ज; जाणून घ्या किमतीसह सर्व गोष्टी

MHLive24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सॅमसंग ही कंपनी सध्या टॉप कंपन्यांपैकी एक आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि इतर मोबाइल कंप्युटिंग प्रोडक्ट सदर कंपनी विकते. आता कंपनीने या व्यतिरिक्त आणखी काही ऍडव्हान्स करण्याचे ठरविले आहे.(Awesome charger)

त्यानुसार कंपनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देखील विक्री करते. आता सॅमसंग एका नवीन चार्जरवर काम करत आहे, ज्यामुळे सर्व उत्पादने जलद चार्ज होतील. चार्जर EP-T6530 आहे. चला जाणून घेऊयात काय खास असेल.

एकाच वेळी तीन प्रोडक्ट्स चार्ज करू शकता

Advertisement

नावाप्रमाणेच, हे एक चार्जिंग अॅडॉप्टर आहे जे तुम्हाला तुमची सर्व प्रोडक्ट्स एकाच वेळी चार्ज करण्याचा मार्ग प्रदान करते जेणेकरुन एकापेक्षा जास्त अॅडॉप्टर घेऊन जावे लागणार नाही. दुस-या शब्दात सांगायचे तर, जे लोक प्रवास करत आहेत आणि टूरवर आहेत त्यांच्यासाठी हे विशेषतः उपयुक्त ठरेल.

एकदम जलद होईतील फुल चार्ज

सदर चार्जर आधीच काही युरोपियन वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, तथापि, कंपनीने अद्याप उत्पादनाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Advertisement

अॅडॉप्टरमध्ये तीन पोर्ट (1x 65W USB Type-C, 1x 25W USB Type-C, आणि 1x 15W USB Type-A) असल्यामुळे कमाल पॉवर आउटपुट 65W असेल कि 105W असेल हे अजून सांगता येत नाही. युरोपियन वेबसाइट लिस्टिंग मध्ये त्याची 56 युरो किंमत (सुमारे 4,600 रुपये) दिसून येते.

ही प्रोडक्ट्स लवकर चार्ज होतील

हे स्पेसिफिकेशन्स खरे असल्यास, तुम्ही तुमच्या Galaxy Book, Galaxy S21 किंवा Galaxy Z Flip3 दरम्यान काहीही चार्ज करू शकता. तथापि, अद्याप हे प्रॉडक्ट अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेले नाही.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker