बिना ऑर्डर आणि पेमेंटशिवाय ‘तिला’ अमेझॉनकडून आले हजारो पार्सल; त्यानंतर जे झाले….

MHLive24 टीम, 26 जून 2021 :- सध्या ऑनलाईन शॉप‍िंगचा जमाना आहे. आज प्रत्येक जण ऑनलाईन शॉप‍िंग करतो. ऑनलाईन शॉप‍िंग करणाऱ्यांसाठी ई-कॉमर्स साइट खूप चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. त्यामध्ये सध्या Amazon हे नाव आघाडीवर आहे.

ऑनलाईन शॉप‍िंग केल्यानंतर आपल्याला त्याचे पैसे पेड करावे लागतात आणि ते प्रोडक्ट घ्यावे लागते. परंतु जर ऑर्डर न करता आणि पैसे न देता एकामागून एक हजारो पार्सल अचानक तुमच्या घरात आले तर तुम्ही काय कराल?

Advertisement

अशा परिस्थितीत, त्या येणाऱ्या बॉक्समध्ये फक्त एकच गोष्ट आली तर चिडचिडेपणा वाढेल आणि मग आपण रागाने लाल देखील होऊ शकता. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या बाबतीतही असेच घडले जिथे ऑर्डर न देताही Amazon कडून तिला एकापाठोपाठ एक हजारो पार्सल मिळाले.

जिलियन कॅनन नावाच्या या महिलेने सांगितले की 5 जूनपासून हे बॉक्स तिच्या घरी येऊ लागले. सुरुवातीला, तिला वाटले की तिच्या बिजनेस पार्टनर ने हे ऑर्डर केले असावे, परंतु हजारो पार्सल मिळाल्यानंतर ती विचार करू लागली की हा घोटाळा आहे.

Advertisement

पहिल्यांदा बॉक्स मिळाल्यावर त्यांनी कस्टमर सपोर्ट सर्विसशी संपर्क साधला की Amazon ने चुकून त्यांना पार्सल पाठवले आहे आणि त्यांनी ते परत घ्यावेत. यासोबतच त्यांनी फेसबुकवरही या प्रकरणाविषयी पोस्ट केले. पण अमेझॉन एक्झिक्युटिव्हने त्यांना सांगितले की या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या पत्त्यावर देण्यात आल्या आहेत.

बॉक्समध्ये काय होते ? :- एनबीसी न्यूजच्या अहवालानुसार, जिलियनने जेव्हा हे बॉक्स उघडले तेव्हा त्यांना हजारो सिलिकॉन सपोर्ट फ्रेम मिळाल्या ज्या फेस मास्कमध्ये वापरल्या जातात. या फ्रेम्स प्रौढ आणि मुलांच्या आकाराचे होते. दरम्यान, पार्सल जिलियनकडे येत राहिले.

Advertisement

त्यामध्ये जिलियनच्या घराचा डिलिव्हरी पत्ता देण्यात आला होता, तो परत करण्यासाठी परत पत्ता देण्यात आला नव्हता. पार्सल कोणाला पाठविले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत जिलियन ट्रॅकिंग क्रमांक सर्च करत राहिली तसेच बारकोड स्कॅन करत राहिली जेणे करून हे कुणी पाठ्वले हे समजेल.

Amazon ने हे उत्तर दिले :- या पार्सलबद्दल जाणून घेण्यासाठी जिलियनने पुन्हा अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधला पण त्याबद्दल काहीही कळले नाही. तिने सांगितले की तिचे पती आणि त्यांनीही हे ऑर्डर्स घेण्यास नकार दिला. पण त्यानंतर ही पार्सल ट्रकमध्ये येऊ लागली.

Advertisement

तथापि, जिलियनच्या विरोधानंतर नंतर Amazon त्याच्या मूळ मालकाचा शोध घेण्यास सफल झाला. परंतु त्यांनी सांगितले की जी उत्पादने वितरित केली गेली आहेत ती जिलियनकडेच ठेवावी लागतील.

हॉस्पिटलला डोनेट केले फ्रेम :- जेव्हा Amazon ने उत्पादन परत घेतले नाही तेव्हा जिलियनला या मास्क ब्रैकेटचे काय करावे असा विचार पडला. जिलियन आणि तिचे बिजनेस पार्टनर एक DIY क्रिएटिव्ह स्टुडिओ चालवित आहेत. या सिलिकॉन फ्रेम्समधून त्याने डीआयवाय मास्क बनवले आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात डोनेट केले.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit