Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अबब! जगातील 31 देशांच्या जीडीपीपेक्षाही अधिक संपत्ती दान केलीये ‘ह्या’ महिलेने

0 0

MHLive24 टीम, 16 जून 2021 :- जगातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या जेफ बेझोसची पूर्व पत्नी मॅकेन्झी स्कॉट सध्या चर्चेत आहे. कारण तिने 286 संस्थांना 2.74 ब‍िलियन डॉलर्स दान दिले आहेत. अपवर्दी डॉट कॉमच्या अहवालानुसार घटस्फोटानंतर आतापर्यंत तिने 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त दान केले आहेत.

विशेष बाब म्हणजे ही रक्कम जगातील एकूण 31 देशांची एकूण जीडीपीसुद्धा नाही. बिल मेलिंडा गेट्सने जगातील सर्वाधिक देणगी दिली आहे. जे 27 वर्षांत 50 बिलियन डॉलर आहे.

Advertisement

स्कॉटने नुकतेच जाहीर केले की, त्यांनी आणि त्यांच्या टीम ने 286 संस्थांना 2.74 बिलियन डॉलर दान केले आहेत. देणगीचे प्रमाण वेगवेगळे असले तरी ते प्रति संघटनेत सरासरी10 मिलियन डॉलर्स आहे. त्यानंतर त्यांनी पोस्‍ट मीडि‍यममध्ये या देणग्याबद्दल एक लेखही लिहिला आहे. विशेष म्हणजे जेफ बेझोसपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने दोन वर्षांत 8 अब्ज डॉलर्सहून अधिक देणगी दिली आहे.

जगातील 31 देशांचीही इतकी जीडीपी नाही: दोन वर्षांत 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त देणगी हा आकडा
मुळीच कमी नाही. बिल-मेलिंडा फाउंडेशननंतर असणारी आतापर्यंतची ही सर्वात मोठी देणगी आहे. विशेष गोष्ट अशी आहे की सध्या जगातील 31 देशांचा अंदाजित जीडीपीही तितकासा नाही.

Advertisement

लाइबेरिया आणि बार्बाडोस व सेंट लुसिया आणि डोमिनिका या देशांमधील जीडीपी 8 बिलियनपेक्षा कमी आहेत. त्याच वेळी, जगातील एकूण 13 देशांची एकूण जीडीपी एकत्र केली गेली तर मॅकेन्झी स्कॉटने दोन वर्षांत तेव्हडी संपत्ती दान केली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement