Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

लॉन्च झाली ‘ही’ शानदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Mhlive24 टीम, 23 जानेवारी 2021:देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक टूव्हीलर उत्पादक कंपनी Okinawa ने आज नवीन Okinawa Dual  इलेक्ट्रिक स्कूटर देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 58,998 रुपये असून लूक आणि इंजिनच्या दृष्टीने ती खूपच आकर्षक आहे.

Advertisement

ओकिनावा ड्युअल इलेक्ट्रिक स्कूटर एक B2B स्कूटर आहे जे  व्यावसायिकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे स्कूटर 200 किलो पर्यंत वजन उचलण्यास सक्षम आहे.

Advertisement

कंपनीने हे फायर रेड आणि सनशाईन यलो या दोन रंगात सादर केले असून त्यामध्ये 92 टक्के देशी उपकरणे वापरली गेली आहेत. समोर आणि मागील दोन्ही बाजूला एक लोडिंग कॅरियर आहे, ज्यावर आपण आपल्याला आवश्यक वस्तू ठेवू शकता.

Advertisement

याशिवाय, या स्कूटरसह कंपनी मल्टीपल कस्टमाइज एक्सेसरीज देखील देणार आहे ज्यामध्ये डिलीवरी बॉक्स, स्केटेबल कॅरेट्स आणि कोल्ड स्टोरेज बॉक्स इत्यादींचा समावेश आहे.

Advertisement

ओकिनावा ड्युअलच्या बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झालेच तर 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर वापरली गेली आहे, जेणेकरून ताशी 25 किलोमीटर वेग पकडेल. 75 किलो वजनासह, ओकिनावा ड्युअलच्या पुढील चाकाला डिस्क ब्रेक आहे आणि मागील चाकास ड्रम ब्रेक आहे.

Advertisement

कंपनीने 48 वॅट क्षमतेची 55Ah क्षमतेची Lithium-iOn बॅटरी दिली असून ती दीड तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. ते पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो आणि एकदा चार्ज झाल्यावर ते 130 किलोमीटर अंतर जाऊ शकते.

Advertisement

त्याशिवाय रिमोट ऑपरेटिंग, साइड फूटरेस्ट, हार्ड मॅट डिझाईन, फोन होल्डर, चार्जिंग पोर्ट, वॉटर बॉटल कॅरियर यासारखे इतर काही फीचर्स या स्कूटरमध्ये देण्यात आली आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement