Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अजितदादांना वाढदिवासाची ‘ही’ खास भेट

0 94

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :- राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला कोणी काही काही भेट देत असते. ही भेट मोठ्या भेटवस्तूत असते. दागिन्यात असते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची भगिनी,खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली भेट कायमस्वरपी स्मरणात राहील, अशी आहे.

४५० मुला-मुलींचा वर्षभर सांभाळ :- पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना भेट म्हणून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सुळे यांनी ही घोषणा केली. कोरोना काळात अनाथ झालेल्या राज्यातील ४५० मुलांसाठी ही योजना आहे.

Advertisement

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ती राबवली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनाथ मुलांना प्रेमाचा आधार दिला जाणार आहे. योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा आहे. पक्षातील ४५० सहकारी या मुलांची जबाबदारी घेणार आहेत. अनाथ मुलींची जबाबदारी पक्षातील महिला, युवती घेतील. मुलांची जबाबदारी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता घेणार आहे, असं सुळे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी दूतांवर जबाबदारी :- ही योजना राबवण्यासाठी पक्षानं ‘राष्ट्रवादी दूत’ तयार केले आहेत. हे दूत ४५० अनाथ मुलांच्या घरात जातील. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाला देतील. शिवाय, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडं उपलब्ध असलेली या अनाथ मुलांची माहिती जमा केली जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला जाईल. संपूर्ण उपक्रमाची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाइटवर व माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, असं सुळे यांनी सांगितलं.

Advertisement

पोकळी भरून काढणार :- ‘अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढण्याचं ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून करण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. या योजनेत सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement