Big News : मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘ह्या’ निर्णयाने लाखो शेतकऱ्यांना होणार थेट फायदा, चेक करा डिटेल्स

MHLive24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यासांठी अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा त्याचा हेतू आहे. आता आणखी एक मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे.(Big News)

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेला 5 वर्षांसाठी म्हणजेच 2021-26 या आर्थिक वर्षासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा 22 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला.

PMKSY बद्दल 4 खास गोष्टी

Advertisement

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 2015 मध्ये एक अम्ब्रेला स्कीम म्हणून सुरू करण्यात आली होती. ही योजना जलशक्ती मंत्रालयामार्फत चालवली जाते. या योजनेचे पहिले उद्दिष्ट एक्सेलरेटेड इरीगेशन बेनिफिट प्रोग्राम (AIBP) आणि प्रत्येक शेतास पाणी असे आहे.

यामध्ये प्रत्येक शेतास पाणी या मध्ये कमांड एरिया डेव्हलपमेंट (CAD), पृष्ठभाग लघु पाटबंधारे (SMI), जलस्रोतांची दुरुस्ती-नुतनीकरण आणि जीर्णोद्धार (RRR) आणि भूजल विकास घटक असे 4 भाग आहेत.

आणखी दोन योजनांचा समावेश आहे

Advertisement

PMKSY मध्ये आणखी दोन योजनांचा समावेश आहे ज्या 2 इतर विभागांद्वारे चालवल्या जातात. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ योजना कृषी विभागामार्फत आणि पाणलोट विकास योजना ग्रामीण विकास मंत्रालयाशी संबंधित भूसंसाधन विकास विभागामार्फत राबविण्यात येते.

AIBP मध्ये काय खास आहे ?

केंद्र सरकारने 1996-97 मध्ये प्रवेगक लाभ कार्यक्रम (AIBP) सुरू केला होता. देशातील प्रत्येक प्रदेशातील मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत, देशातील अशा प्रकल्पांकडे लक्ष दिले जाते, जे पूर्णत्वाच्या जवळ आहेत, परंतु आर्थिक अडचणींमुळे पूर्ण होऊ शकत नाहीत.

Advertisement

नंतर हा कार्यक्रम 2016 मध्ये PMKSY मध्ये विलीन करण्यात आला. PMKSY मध्ये सामील होताना AIBP अंतर्गत 297 सिंचन आणि बहुउद्देशीय प्रकल्प होते. त्यापैकी 143 प्रकल्प आत्तापर्यंत पूर्ण झाले असून 5 प्रकल्प पूर्ववत करण्यात आले आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker