Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

‘हा’ व्यवसाय अगदी सोपा अन मागणीही जास्त; जाणून घ्या…

0 2

MHLive24 टीम, 04 जुलै 2021 :- अनेक असे लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यामध्ये जास्त रस आहे. अशात कोरोनाच्या या जीवघेण्या काळामध्ये व्यवसायाला जास्त महत्त्व प्रात्प झालं आहे. तुम्हालाही जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आयडिया घेऊन आलो आहोत.

आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत जो तुम्ही खर्चात सुरू करू शकता. हा आहे केळ्यांच्या चिप्सचा व्यवसाय. हे चिप्स तब्येतीला चांगले असतात. उपवासालाही लोक हे चिप्स खातात.
अगदी सोप्या पद्धतीने या व्यवसायाला सुरूवात करून तुम्ही महिन्याला एका लाखांपर्यंत कमवू शकता.

Advertisement

या व्यवसायासाठी लागणारी उपकरणे

  • केळ्यांना धुण्यासाठीचं टँक आणि केळे सोलण्याची मशीन
  • केळ्यांना पातळ तुकड्यांमध्ये कापण्याची मशीन
  • टुकड्यांना फ्राय करणारी मशीन
  • मसाले लावण्याची मशीन
  • पाऊच प्रिटिंग मशीन
  • प्रयोगशाळा उपकरणं

किती येईल खर्च :- 50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत कमी 120 किलो कच्च्या केळ्यांची गरज आहे. 120 किलो कच्ची केळी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपयांना मिळतील. याबरोबर 12 ते 15 लीटर तेलाची गरज लागते. 15 लीटर तेल 70 रुपयांच्या हिशेबानं 1050 रुपयांना पडेल.

Advertisement

चिप्स फ्रायर मशीनला एक तासात 10 ते 11 लीटर डिझेल लागतं. 1 लीटर डिझेल 80 रुपयांच्या हिशेबानं 11 लीटर लागलं तर 900 रुपयांना पडेल. मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रुपयांना पडतील. मग तुमचे 3200 रुपयांमध्ये 50 किलो चिप्स तयार होतील.

म्हणजे एक किलोच्या चिप्सचं पाकीट 70 रुपयांना पडेल. तुम्ही आॅनलाइन किंवा किराणा दुकानात ते पाकीट 90 ते 100 रुपयांना विकू शकाल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement