This Bank not follow RBI rules, took big action: RBI च्या नियमांचे पालन करत नव्हती ‘ही’ बँक, केली मोठी कारवाई; तुमच्या खात्यावर काय होईल परिणाम ?

MHLive24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या अपना सहकारी बँकेला 70 लाखांहून अधिक दंड ठोठावला आहे. ही सहकारी बँक आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे.(This Bank not follow RBI rules, took big action)

काय म्हणाले आरबीआय

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेच्या वैधानिक तपासणीत असे दिसून आले आहे की, अपना सहकारी बँकेने एनपीए वर्गीकरणासह अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे.

Advertisement

बँकेने बचत बँक खात्यात किमान शिल्लक न राखण्यासाठी आणि मृत वैयक्तिक ठेवीदारांच्या चालू खात्यातील ठेवींवरील व्याज भरताना किंवा दावे निकाली काढताना दंडात्मक शुल्क आकारण्याच्या निर्देशांचे पालन केले नाही.

निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये

आरबीआयने बँकेला नोटीस बजावली होती आणि सांगितलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये, याचे कारण विचारले होते. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेच्या नोटिसीला दिलेल्या उत्तराचे अवलोकन केल्यावर मध्यवर्ती बँक या निष्कर्षापर्यंत पोहोचली की, आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आरोप पुष्टीकृत आहेत आणि आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.

Advertisement

बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर पाहूनच दंड आकारला

मध्यवर्ती बँकेने सांगितले की, बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर पाहूनच दंड आकारण्यात आलाय. आरबीआयने म्हटले आहे की, यासह खासगी सुनावणीदरम्यान केलेल्या अतिरिक्त सबमिशन आणि तोंडी सबमिशन देखील विचारात घेण्यात आल्या.

ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही

Advertisement

आरबीआयने स्पष्ट केले की, नियामक अनुपालनाअभावी दंड आकारण्यात आलाय आणि कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेवर किंवा बँकेने आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही करारावर परिणाम करणार नाही.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker