Bank account give five lakh : ‘ह्या’ बँकेत खाते आहे का? 30 नोव्हेंबरपर्यंत मिळतील 5 लाख

MHLive24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- रिझर्व्ह बँकेने मागील काही दिवसांमध्ये अनेक बँकांवर बंदी घातली आहे. आरबीआयचे अनेक नियम आहेत जेणे करून ग्राहकांना कसलीही गैरसोय होणार नाही. परंतु अनेक बँक या नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे अशा बँकांवर बंदी घातली जाते.(Bank account give five lakh)

आता या अशा बंद झालेल्या बँकांमधील ग्रहांची आनंदाची बातमी आहे. या ठेवीदारांना आता 5 लाख रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ या बँकांच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत परत मिळू शकतात. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भात 27 ऑगस्ट 2021 रोजी एक परिपत्रक जारी केले.

केंद्र सरकारकडून 1 सप्टेंबर रोजी या कायद्याची तरतूद लागू

Advertisement

वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (सुधारणा) अधिनियम, 2021 च्या कलम 1 अंतर्गत उप-कलम (2) नुसार, केंद्र सरकारने 1 सप्टेंबर रोजी या कायद्याची तरतूद लागू केली आहे.

सर्व ठेवीदारांना 5 लाख रुपये मिळतील, ज्यांच्या बँकांना रिझर्व्ह बँकेने स्थगिती दिलीय. बँक ठेवी हमी कायदा संमत होण्याआधीच स्थगितीवर चालणाऱ्या त्या बँकांच्या ठेवीदारांना 5 लाख रुपये दिले जातील.

5 लाख मिळणार म्हणजे काय ?

Advertisement

या श्रेणीमध्ये अनेक बँकांचा समावेश आहे, ज्यांना RBI ने स्थगिती दिली. काही बँकांमध्ये हा कालावधी 90 दिवसांनी वाढवला जाऊ शकतो कारण रिझर्व्ह बँक बँकांच्या विलीनीकरण, व्यवस्था किंवा पुनर्रचना योजनेवर काम करत आहे. इंडसलॉचे भागीदार निशांत सिंह यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, रिझर्व्ह बँक सध्या खराब बँकांच्या पुनर्रचना योजनेवर काम करत आहे, त्यामुळे ती डीआयसीजीसीला ग्राहकांना 5 लाख रुपये देण्याची मुदत आणखी 90 दिवसांनी वाढवण्यास सांगू शकते.

अशा परिस्थितीत ठेवीदारांना 90 दिवसांऐवजी 180 दिवसांत 5 लाख रुपये मिळू शकतात. मुदत वाढवण्याचा सरळ अर्थ असा आहे की, लेखी बंद बँका मोठ्या बँकेत विलीन केल्या पाहिजेत जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या ठेवी सुलभ होतील.

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ घोषणेमुळे मोठा दिलासा 

Advertisement

2021 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँक ठेवींवरील विद्यमान 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण 5 लाखांपर्यंत वाढवण्याची मोठी घोषणा केली. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बँका बंद झाल्या किंवा त्या बुडाल्या नंतरही ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाईल. याशिवाय बँक खातेदारांच्या विम्याची रक्कम 1 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत आहे. म्हणजेच ग्राहकांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहणार आहेत.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker