Offers on smartphone: फ्लिपकार्टवर धमाल! ‘हा’ 5G स्मार्टफोन फक्त 99 रुपयांत

MHLive24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत आहे. Flipkart अन अमेझॉन सध्या टॉपवर आहेत. या दोन्ही साईटवर विविध सेल सुरु असतात. आता Flipkart वर मोबाईल्स बोनान्झा सेल सुरू आहे, जो फक्त दोन दिवसांसाठी आहे.(Offers on smartphone)

स्मार्टफोनवर चालणारा हा सेल 7 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंतच चालेल. सेल दरम्यान, सर्वात महाग स्मार्टफोन देखील खूप स्वस्त मिळत आहेत. या दोन दिवसांच्या सेलमध्ये 5G स्मार्टफोनने धमाल उडवली आहे.

जर तुम्ही एखादा 5G फोन घेण्याच्या विकाहारात असाल तर आणि तुमचे बजेट कमी असेल तर हा सेल तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. Apple, Samsung, Xiaomi, Oppo, Realme यांसारख्या कंपन्यांचे फोन अतिशय स्वस्तात मिळतात.

Advertisement

Realme Narzo 30 5G वर खूप मोठी सूट आहे. सर्व ऑरफचा फायदा उठवण्यास तुम्ही सक्सेस झाल्यास हा फोन फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया कसे…

Realme Narzo 30 5G ऑफर आणि सूट

Realme Narzo 30 5G ची लॉन्च किंमत 17,999 रुपये आहे, परंतु सेल दरम्यान हा स्मार्टफोन 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर हजार रुपयांची सूट दिली जात आहे. पण हा फोन अधिक स्वस्तात खरेदी करता येईल. फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया…

Advertisement

Realme Narzo 30 5G वर बँक ऑफर

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड Realme Narzo 30 5G वर 5% सूट देत आहे. तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 850 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत 16,149 रुपये असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे, जी फोनची किंमत आणखी खाली आणते.

Realme Narzo 30 5G वर एक्सचेंज ऑफर

Advertisement

Realme Narzo 30 5G वर 16,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अदलाबदल केलात तर तुम्हाला खूप सूट मिळू शकते. जर तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच रु. 16,050 चे एक्सचेंज उपलब्ध होईल. जर तुम्ही हि ऑर एकत्रित मिळवण्यात सक्सेस झाले तर हा फोन फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker