Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

‘ह्या’ बँका 7 दिवसांच्या एफडीद्वारे देखील देतात जास्त रिटर्न; जाणून घ्या कोणत्या बँकेत किती व्याज

0 4

MHLive24 टीम, 24 जून 2021 :- सध्या लॉक डाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही लोक आधीपासूनच बेरोजगार आहेत. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि कमाईची साधने उपलब्ध करायची असतील तर गॅस सिलेंडर एजन्सी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण या द्वारे चांगली कमाई करू शकतात.

गॅस वितरण परवाना मिळाल्यानंतर एजन्सी चालू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. यात इतर स्थानिक मंजुऱ्यांसोबतच ऑफिस आणि गोडाऊनचाही समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रातून हे नवे वितरक विशेष करून निवडले जाणार आहेत.

Advertisement

कारण गॅस वापरणाऱ्यांची संख्या या राज्यांत सर्वाधिक आहे. कठोर नियम आणि अटी एलपीजी डीलरशिप मिळवण्यासाठी असल्यामुळे डीलरशिप मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची पूर्ण तयारी करावी लागणार आहे. देशातील तिन्ही तेल कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस वेळोवेळी नव्या डीलरशिपसाठी जाहिरात देत असतात.

तसेच गॅस वितरणाचे जाळे ग्रामीण भागात आणखी सशक्त करण्यासठी केंद्र सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण एलपीजी डिस्ट्रिब्युशन योजनेंतर्गत (आरजीजीएलव्ही)आमंत्रण दिले जाते. यात गॅस कंपन्या एजन्सी, गोडाऊनच्या जमिनीसाठी कंपन्यांचा वॉर्ड, विभाग किंवा निश्चित स्थान जाहिरातीच्या माध्यमातून सांगतात. उमेदवाराची अर्ज केल्यानंतर मुलाखत घेतली जाते.

Advertisement

उमेदवाराला मुलाखतीनंतर वेगवेगळ्या आधारावर नंबर दिले जातात. नोटीस बोर्डावर पॅरामीटर्समधून मिळालेल्या नंबराच्या आधारवर याचा निकाल लावला जातो. त्यानंतर गॅस कंपनीचे एक पॅनल निवडण्यात आलेल्या उमेदवाराच्या जमिनीपासून सर्व गोष्टीची पडताळणी करते. त्यानंतर गॅस एजन्सी त्या उमेदवाराला वितरित करण्यात येते. जाणून घेऊयात सविस्तर

डीलरशिप कशी मिळेल ? :- गॅस एजन्सीची डीलरशिप घेण्यापूर्वी आपल्याकडे संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. डीलरशिप गॅस कंपन्यांकडून दिली जाते. या कंपन्या त्यांचे वितरण नेटवर्क विस्तृत करण्यासाठी शहरांमध्ये विक्रेते शोधतात आणि त्याच आधारावर गॅस एजन्सी डीलरशिप ऑफर करतात.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी मार्चपर्यंत गॅस कंपन्यांना अधिक नवीन वितरकांची आवश्यकता भासणार आहे. याचा अर्थ गॅस एजन्सी डीलरशिपसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर तुम्हीही आधीच तयारी सुरू करा.

अर्ज कसा करावा :- सरकारी गॅस कंपन्या (इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस) डिलरशिपसाठी जाहिरात देतात. या जाहिरातींद्वारे इच्छुक लोकांकडून अर्ज मागविले जातात. यासाठी आपल्याला या कंपन्यांच्या वेबसाइट आणि वर्तमानपत्रकडे लक्ष द्यावे लागेल.

Advertisement

जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा एका विशिष्ट स्वरूपात अर्ज करा. त्याचे संपूर्ण मार्गदर्शन वेबसाइटवर मिळेल. शेवटी डीलरशिप लॉटरी प्रणालीद्वारे दिली जाते. म्हणजेच ज्याचे नाव सोडतीत येईल, त्यांना डीलरशिप मिळेल.

दहावी पासदेखील अर्ज करू शकतो :- कोणतीही 10 वी पास व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी पदवीधर असणे अनिवार्य होते. परंतु आता आपण दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकता. 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे होती.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit