CEO’s of Indian descent : ‘हे’ आहेत जगातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय वंशाचे CEOs; त्यांचा पगार पाहून डोळे गरगरतील

MHLive24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांची सध्या बरीच चर्चा आहे. भारतीय वंशाच्या अग्रवाल यांनी जॅक डॉसी ची जागा घेतली आहे. अग्रवाल यांच्याप्रमाणेच इतर अनेक परदेशी कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत. त्यांचा पगारही लाखो डॉलर्समध्ये आहे. आज आम्ही तुम्हाला भारतीय वंशाच्या 6 सीईओंबद्दल सांगणार आहोत. ज्याचा पगार पाहून तुमचे डोळे फिरतील.(CEO’s of Indian descent)

पराग अग्रवाल: परागचा वार्षिक पगार 1 मिलियन डॉलर (7,50,54,500 रुपये) असेल. एका अहवालानुसार, पगाराव्यतिरिक्त त्यांना 12.5 लाख डॉलर म्हणजेच 93,89,12,500 रुपयांचे स्टॉक युनिट्स मिळतील. पराग अग्रवाल यांना हे स्टॉकचे पैसे 16 क्वार्टरली इनक्रिमेंट मध्ये मिळतील. 37 वर्षीय पराग अग्रवाल कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह बोनस प्लानचा हिस्सा असतील.

अरविंद कृष्णा: 59 वर्षीय भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा हे IBM (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) चे सीईओ आहेत, जी माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. IBM द्वारे प्रदान केलेल्या सुविधांव्यतिरिक्त, अरविंद कृष्णाचा वार्षिक पगार 1.5 मिलियन डॉलर(11,24,23,500.00 रुपये) आहे.

Advertisement

याशिवाय कंपनीचे शेअर्स आणि इतर बोनसचाही समावेश आहे. यामध्ये 13.8 मिलियन डॉलर चा इंसेंटिव, 35% प्रतिबंधित स्टॉक युनिट्स आणि 65% 2020-2022 परफॉर्मन्स शेअर युनिट्स (पीएसयू) चा समावेश आहे.

शंतनू नारायण: Adobe Systems चे CEO, शंतनू नारायण यांना 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. हैदराबादमध्ये जन्मलेले शंतनू नारायण 2007 पासून Adobe Inc. शी संबंधित आहेत. सीईओ आणि अध्यक्ष आहेत. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बॅचलरची पदवी घेतली आहे. 58वर्षीय शंतनू याना वार्षिक 39.2 मिलियन डॉलर पगार मिळतो.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker