बॉलिवूडमधील ‘ह्या’ स्टार्सना आहेत ‘अशा’ काही सवयी ज्या वाचून तुम्ही डोक्याला हात लावाल

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही चांगल्या सवयी असतात तर काही वाईट सवयीही असतात. आपण आपल्या वाईट सवयी लोकांपासुन लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बाॅलीवूडमधील असे काही अभिनेते – अभिनेत्री आहेत की ज्यांना काही वाईट सवयी देखील आहेत.

यामध्ये तुमचे आवडते अभिनेते – अभिनेत्रीही आहेत. त्यांच्या या सवयी ऐकुन तुम्हीही थक्क होऊन जाल. आज आपण बाॅलिवुड मधील काही कलाकारांच्या वाईट सवयी जाणुन घेणार आहोत. चला तर मग बघुया कोणत्या कलाकाराला कोणती वाईट सवय आहे ते.

राणी मुखर्जी :- ९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांतुन झळकलेली अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. राणी ने “राजा की आयेगी बाराच” या चित्रपटातुन बाॅलिवुडमध्ये पदार्पण केले होते. सध्या ती चित्रपटांपासुन थोडी दूर आहे. मात्र अलीकडेच तिने “मर्दानी” या चित्रपटातून कमबॅक केले होते. बाॅलीवूड आणि व्यसन हे एक अजब समीकरण आपल्याला पाहायला मिळते. याच बाबतीत राणी मुखर्जीची वाईट सवय म्हणजे ती सिगारेट ओढते.

Advertisement

प्रीती झिंटा :- बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाला साफसफाई आणि स्वछतेची अति सवय आहे. ती हॉटेलच्या खोलीत पोहोचते तेव्हा सर्वात अगोदर ती बाथरूमची स्वच्छता पाहते. जरी स्वच्छता करण्याची सवय चांगली असली तरी ही अति सवय जेव्हा शिगेला पोहोचते तेव्हा ती इतरांसाठी समस्या निर्माण करू शकते.

सुष्मिता सेन :- सुष्मिता सेनची आवड ऐकाल तर तुम्ही हैराण व्हाल. सुष्मिताला चक्क घरामध्ये साप पाळण्याची आवड आहे. तसेच एखाद्या खुल्या छतावर एखाद्या टबमध्ये आंघोळ करण्याची देखील आवड आहे.

विद्या बालन :- विद्या बालनची एक सवय ऐकल्यावर तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. झोपताना सर्वजण सुटेबल नाईट सूट घालून झोपतात. पण विद्या बालन मात्र नाईट सुट ऐवजी साडीवरच झोपणे पसंत करते.

Advertisement

जाॅन अब्राहम :- बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहमला स्वतःचे पाय हलविण्याची भारी विचित्र सवय आहे. ही सर्वसाधारण सवय असली तरी काही वेळेस ती समोरच्यासाठी इरिटेटिंग ठरू शकते. ज्यामुळे जाॅनला बऱ्याचदा ऐकावे लागते.

करीना कपूर :- करीना कपूरची वाईट सवय म्हणजे ती सतत हाताच्या बोटाची नखे चावत असते.

सलमान खान : – सलमान खानला सुद्धा एक सवय आहे. खरेतर आपण याला त्याची आवड म्हणू शकतो. सलमानकडे साबनांचा खूप मोठा असा संग्रह आहे. सलमानकडे हाताने बनवलेले डिजाइनर आणि हर्बल असे सर्व प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. सलमानला अशाप्रकारे साबणी जमवण्याची आवड आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker