‘हे’ 5 मंत्र तुम्हाला करतील श्रीमंत; जाणून घ्या आर्थिक सुबत्तेचा एक्सप्रेस वे

MHLive24 टीम, 14 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने लोकांना अनेक धडे दिले आहेत. पैशांची बचत, योग्य गुंतवणूक यांचे महत्व लोकांना समजले आहे. भविष्यात या अशा अनेक समस्या येऊ शकतात. यासाठी वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.

आजच्या काळात श्रीमंत व्हायचे असेल तर बचत गरजेची आहेच पण त्या बरोबर गुंतवणूक फार महत्वाची आहे. काळाच्या ओघात यशस्वी व्ह्याचे असले, श्रीमंत व्हायचे असले तर काही मूलमंत्र आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे, फॉलो केले पाहिजे. आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अंमलात आणल्याच पाहिजेत. जाणून घेऊयात अशा काही टिप्स

Advertisement

१. कमवाल त्यापेक्षा कमी खर्च करा :- ही वरकरणी सोपी दिसणारी बाब आहे मात्र अनेकजणांना यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही जे काम करत आहात त्याची बाजारात किंमत किती आहे हे जाणून घ्या. तुमच्या कौशल्यांचे मूल्यमापन करा. तुम्ही करत असलेले काम तुमच्या कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणून घ्या.

त्याशिवाय तुमच्या कंपनीबाहेर त्या कामाला किती किंमत आहे हे समजून घ्या. यातून तू हे जाणू शकाल की तुम्हाला मिळणारा पगार योग्य आहे की कमी आहे. याचबरोबर हे लक्षात ठेवा तुम्हाला मिळणारा पगार कितीही कमी असो तुमचा खर्च हा तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त असता कामा नये.

Advertisement

अनेकवेळा जास्त कमवण्यापेक्षा कमी खर्च करणे अधिक सोपे असते. थोड्याशा प्रयत्नांनी तुम्ही बचत करू शकता आणि त्यासाठी खूप मोठा त्याग करण्याचीही आवश्यकता नसते.

२. तुमच्या बजेटचे पालन करा :- बजेट आखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अखेर तुमचे पैसे कुठे जात आहेत हे बजेट आखल्याशिवाय तुम्हाला कसे कळणार? तुमचा खर्च आणि बचत याचे आकलन तुम्हाला बजेट आखल्यावरच होईल. तुम्ही काही हजार कमवा किंवा लाखो कमवा, बजेट इज मस्ट.

Advertisement

३. लवकर गुंतवणूक सुरू करा :- जितक्या लवकर आपण गुंतवणूक सुरू करता तितक्या दीर्घ मुदतीमध्ये आपल्याला अधिक फायदा होईल. कंपाऊंडिंगच्या सामर्थ्यामुळे, आपल्याला कालांतराने रिटर्नवर रिटर्न मिळेल, जे आपल्याला कमी गुंतवणूकीद्वारेही दीर्घ मुदतीत मोठा निधी मिळविण्यास मदत करतील. उदाहरणार्थ, 26 वर्षांच्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर 2 कोटी निधीसाठी दरमहा 3,500 रुपयांच्या एसआयपीची आवश्यकता असते.

येथे वार्षिक व्याज 12 टक्के असे गृहित धरले जाते. त्याचबरोबर जर त्याने वयाच्या 36 व्या वर्षी म्हणजेच दहा वर्षांनंतर आपला इक्विटी फंड एसआयपी सुरू केला असेल तर त्याच आकाराचे रिटायरमेंट कॉर्पस तयार करण्यासाठी त्याला त्याच व्याज दरावर मासिक 12,000 रुपयांचे एसआयपी योगदान द्यावे लागेल.

Advertisement

४. रिटायरमेंट प्लॅनसाठी गुंतवणूक :- रिटायरमेंटसाठी दरमहा नियमितपणे दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करा. कारण आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या, दैनंदिन खर्च इत्यादी बाबींमुळे तुमच्या हातातील पैसे खर्च होत राहतात. पाहता पाहता तुम्ही निवृत्त व्हाल आणि तुमच्या हाती फारसे पैसे राहणार नाहीत. तरुणवयातच रिटायरमेंटसाठी केलेल्या गुंतवणुकीची मधूर फळे तुम्हाला निवृत्तीनंतरच्या आयुष्यात चाखता येतील.

५.आर्थिक लक्ष्ये स्पष्ट असणे आवश्यक आहे :- आपण करत असलेल्या प्रत्येक दीर्घ-मुदतीच्या गुंतवणूकीला उद्दिष्ट्य असले पाहिजे. असे केल्याने आपणास आपल्या आर्थिक उद्दीष्टांचे प्रमाण आणि ते साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेळेचा स्पष्ट अंदाज मिळू शकेल.

Advertisement

ठरलेल्या वेळेत निश्चित लक्ष्य गाठण्यासाठी अंदाज बांधल्यानंतर आपल्यासाठी कॉर्पस तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मंथ गुंतवणूकीचा अंदाज करणे सोपे आहे. ही सर्व माहिती एकत्रित केल्यानंतर, आपल्या पसंतीच्या आधारावर आपण आपल्या अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांकरिता आपला निधी प्रवाह सहजपणे ठरवू शकता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement