Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

लहान मुलांची मालिश करण्यासाठी हे ३ तेल आहेत खूप प्रभावी, केसांना देखील बनवतात मजबूत

0

MHLive24 टीम, 7 जून 2021 :- जर आपल्या घरात लहान बाळ असेल , तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जाणून घ्या अशा प्रकारच्या काही तेलांविषयी , ज्याच्या वापरामुळे लहान मुलांचे केस दाट होतात व जलद गतीने वाढतात.

जर लहानपणापासूनच मुलाच्या केसांची काळजी घेतली गेली आणि चांगल्या तेलाने मालिश केली तर मुलाचे केस अधिक दाट आणि मजबूत होतात. तेलांची मालिश केसांसाठी खूप महत्वाची मानली जाते, कारण मुळांपासून शेवटपर्यंत केसांना पोषण मिळते.

Advertisement

बाजारात बाळाच्या डोक्याची मालिश करण्यासाठी अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, कोणते तेल घ्यावे जे बाळांसाठी चांगले असेल याबाबत आपण गोंधळलेले असता . मुलांचे केस मजबूत आणि निरोगी बनविण्यासाठी जाणून घ्या काही फायदेशीर तेलांची नावे .

1. नारळ तेल :- जेव्हा जेव्हा बाळाची काळजी घेण्याचा विषय निघतो तेव्हा नारळ तेलाचे नाव नक्कीच येते. नारळ तेल शतकानुशतके केसांची निगा राखण्यासाठी वापरले जात आहे तसेच बाळाच्या डोक्याची मालिश करण्यासाठी देखील हे तेल वापरले जात आहे .

Advertisement

नारळ तेल का विशेष आहे :- वास्तविक, नारळ तेलात कोणतेही रसायन नसते आणि त्यात कर्बोदके , अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. नारळाच्या तेलात असलेले घटक केस गळणे आणि टक्कल पडण्यासही प्रतिबंध करतात.

बालरोग तज्ञांच्या मते, बाळांच्या केसांची काळजी घेण्यासाठी ‘मॉम्स को. नॅच्युरल 10-इन -1 बेबी हेयर ऑइल’ वापरू शकता . नारळ तेलाबरोबरच त्यात इतर ९ तेलांचे गुणधर्म देखील आहेत.

Advertisement

2. एरंड्याचे तेल :- एरंड्याचे तेल मुलांच्या केसांच्या वाढीसाठी चांगले असते आणि हे टाळू संसर्गापासून प्रतिबंधित करते. त्यात व्हिटॅमिन ई, फॅटी ऍसिड आणि ओमेगा -9 असतात. आपण आपल्या बाळाच्या मालिशसाठी ‘वेदसुन कॅस्टर ऑइल 100% प्युअर अँड एडिटेबल फॉर हेअरकेअर अँड बेबी मसाज ‘वापरू शकता. ह्यांनी आपण केसांची त्याचबरोबर बाळाच्या शरीराची देखील मालिश करू शकता.

3. मोहरीचे तेल :- मोहरीच्या तेलाचा उपयोग बाळाच्या डोक्यावर आणि शरीरावर मसाज करण्यासाठी केला जातो. हे केसांच्या वाढीस मदत करते. मोहरीच्या तेलामध्ये ओलेक आणि लिनोलिक ऍसिड असते, जे टाळूवर रक्त परिसंचरण उत्तेजित करते.

Advertisement

आपण बाळाच्या मालिशसाठी मोहरीचे तेल निवडू शकता. आपण बाळाच्या मालिशसाठी ‘ब्लिस ऑफ अर्थ ऑरगॅनिक मस्टर्ड ऑइल फॉर हेअर ग्रोथ अँड बेबी मसाज ‘ हे मोहरीचे तेल वापरू शकता .

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement