Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला अन म्हणे कोरोनाने मेला!

0

MHLive24 टीम, 7 जून 2021 :- आपल्या भारतीय संस्कृतीत पती पत्नीचे नाते अत्यंत पवित्र समजले जाते. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे तसेच  त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून प्रत्येक विवाहित महिला वटपौर्णिमेला पुढील जन्मी देखील हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत असते.

मात्र  विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पत्नीनेच आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या इंजिनीअर पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याला कोरोना झाल्याचा बनाव केल्याची घटना घडली.

Advertisement

याप्रकरणी  पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे .अश्विनी मनोहर हांडे व  गौरव मंगेश सुतार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मनोहर नामदेव हांडे असे खून केलेल्या पतीचे नाव आहे.

अश्विनी हांडे व गौरव सुतार यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये मनोहर हा अडथळा ठरत होता. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मनोहरला समजली होती. दरम्यान, मनोहरला कोरोना झाल्याने तो गेले १५ दिवस घरीच राहून उपचार घेत होता.

Advertisement

नेमकी संधी साधून अश्विनी आणि गौरव यांनी मनोहरला मारण्याचा कट रचला अन २३ मे रोजी रात्री अश्विनीने पती मनोहरला दुधातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तो झोपल्याची खात्री करून  गौरवला घरी बोलावून घेत या दोघांनी मिळून मनोहरचा गळा दाबून खून केला.

दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी सकाळी अश्विनीने तिच्या आईला मनोहर झोपेतून उठत नाही. त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर काहीजणांच्या उपस्थित मनोहरचा अंत्यविधी देखील उरकला.

Advertisement

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपास सुरू असताना मनोहरच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन मग हा प्रकार समोर आला.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement