वर्दीमुळे वाचले लहानग्याचे प्राण

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- वर्दीत शिस्त असते. कठोरपणा असतो; परंतु त्यातही माणुसकीच असते. त्याचा प्रत्यय पालघरमधील पोलिसामुळं आला. पोलिसाच्या तत्परतेनं एका दहा वर्षांच्या मुलाचे प्राण वाचले.

पोलिस शिपायाची कार्यतत्परता :- रेल्वे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वसई रेल्वे स्थानकावर एका दहा वर्षीय मुलाचे प्राण वाचले आहेत. रेल्व रुळावर पडल्यामुळे हा मुलगा जखमी झाला होता. रेल्वे पोलिसात शिपाई असलेल्या ठाणाबीर यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. जखमी झालेल्या मुलाचे नाव मलेशी देवाप्पा एलगी आहे.

Advertisement

वसई रेल्वे स्थानकावर अपघात :- मलेश एलगी नावाचा दहा वर्षांचा मुलगा सकाळी 11.15 वाजता चर्चगेट ते विरार दरम्यान स्लो लोकल ट्रेनमधून आला होता. या वेळी वसई रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हा मुलगा अपघाताने रेल्वे रुळावर पडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार समजल्यानंतर रेल्वे पोलिसातील एका शिपायाने घटनास्थळी धाव घेतली.

मुलाला कडेवर घेत धावत नेले दवाखान्यात :- प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असणाऱ्या या पोलिस शिपायाने मलेश एलगी याला रुळामधून बाहेर काढले. त्यासाठी या पोलिस शिपायाने प्रवाशांची मदत घेतली. त्यानंतर कुठल्याही मदतीची वाट न पाहता या पोलिस शिपायाने लहानग्याला हातात उचलले. तसेच प्लॅटफॉर्मवरुन धावत जात मुलाला जवळच्या रवी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल केले.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit