रांगेत थांबण्याचे टेन्शन संपले; आता 5 मिनिटांत अंगठा लावून ATM मधून काढा तुमचं रेशन

MHLive24 टीम, 16 जुलै 2021 :-  आता ग्राहकांना धान्य घेण्यासाठी सरकारी रेशन दुकानांसमोर लांबच्या लांब रांगेत उभा राहण्याची गरज नाही. तसेच कमी रेशन मिळाल्याची तक्रार करण्याचीही परिस्थिती उद्भवणार नाही. तुम्ही आतापर्यंत आपण विविध बॅंकांच्या एटीएममधून फक्त पैसे काढले असतील, पण आता आपल्याला एटीएममधून धान्यदेखील काढता येणार आहे.

हरियाणातील गुरुग्राममध्ये देशातला पहिला ‘ग्रेन एटीएम’ पायलट प्रोजेक्ट स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. तुम्ही एटीएमच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटात धान्य काढू शकता. देशातील हे पहिले एटीएम आहे, येथून पैशांऐवजी धान्य निघेल.

Advertisement

चौटाला यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचीही जबाबदारी आहे. ते म्हणाले, की ”ग्रेन एटीएम’मुळे रेशनच्या प्रमाणात, वेळेचे अचूक मोजमाप केले जाईल. संबंधित सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल.

‘ग्रेन एटीएम’ मुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे; पण शिधावाटप दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे की नाही, ग्राहकांची ही चिंता देखील दूर होणार आहे.” पूर्वीच्या तुलनेत सार्वजनिक अन्नवितरण प्रणालीत अधिक पारदर्शकता येणार आहे.

Advertisement

या एटीएम मशीनद्वारे तुम्ही पाच ते सात मिनिटांत एकाच वेळी 70 किलो धान्य काढू शकता. गुरुग्रामच्या फारूक नगरमध्ये स्थापन केलेली ही बँक एटीएमच्या धर्तीवर काम करेल. अंगठा (पंच टॅक्स) लावून ग्राहकांना येथून धान्य मिळू शकेल. ही एक स्वयंचलित मशीन आहे, जी बँकेच्या एटीएमसारखे कार्य करते.

बायोमेट्रिकच्या मदतीने आपण त्यातून धान्य काढू शकाल. बायोमेट्रिकद्वारे खात्री करून घेतल्यानंतर सरकारने स्वतःच लाभार्थ्यांना ठरविलेले अन्नधान्य मशीनअंतर्गत बसविलेल्या बॅगमध्ये भरले जाईल.

Advertisement

युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित होणाऱ्या या मशीनला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य वितरण मशीन असे म्हणतात. त्याच वेळी अधिकारी अंकित सूद म्हणाले की, या मशीनमुळे धान्यात काही गडबड होणार नाही.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement