Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

पुरंदर किल्ल्यावर उभं राहणार छत्रपती संभाजी महाराजाचं शिल्प

0 3

MHLive24 टीम, 23 जून 2021 :-  छत्रपती संभाजी महाराज यांचं शिल्प उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आर्थिक तरतुदीला मान्यता

या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नगरसेवक अर्चना पाटील यांनी याबाबत प्रस्ताव सदर केला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याला मान्यता दिली. पुणे शहराजवळील सिंहगडावर २०१७ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे भिंतीशिल्प बसविण्यात आले आहे.

Advertisement

या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमार्फत २५ लाखा रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.

याच धर्तीवर स्वराज्यप्राप्तीसाठी केलेल्या संघर्षमयी युद्धात आपले निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य शिल्प पुरंदर किल्ल्यावर उभारण्यासाठी स्थायी समिती मार्फत एक कोटी रुपयांची तरतुदीला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी केली होती. याला आज मंजुरी मिळाली.

Advertisement

शूरवीर आणि कुशाग्र बुद्धीचा राजा

छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे पुत्र होत. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुण्यातील हडपसर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ रोजी झाला होता.

छत्रपती संभाजी महाराज हे शूरवीर तर होतेच; पण संस्कृतभाषा निपुणही होते. छत्रपती संभाजी महाराज हे अतिशय प्रजाहितदक्ष होते.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन अनेक मोहिमा त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य हे त्यांचे विशेष गुण होते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement