Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

बलात्काराचा आरोपी कोविड सेंटरमधून पळाला

0 290

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला कैद्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या अलिबाग – नेहुली जिल्हा क्रीडा संकुल येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या कोविड सेंटर कारागृहात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.

शोध मोहीम सुरू :- या आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला उपचारासाठी कैद्यांसाठी असेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये तात्पुरतं ठेवण्यात आले होते. तिथून त्याने पलायन केल्याने पोलिसांत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जेल प्रशासनाने तातडीची पावले उचलीत सर्व स्तरावर शोध मोहीम हाती घेतली आहे.

Advertisement

योग्य संधी साधून धूम ठोकली :- अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील 68 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या पाहता काही कैद्यांवर नेहुली येथील क्रीडा संकुलाच्या इमारतीत तात्पुरते स्वरुपात कारागृह कक्ष तयार करून तिथे उपचार सुरू आहेत.

यामध्ये पोलादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला नाईकू उर्फ देवा मारुती दगडे हा आरोपीदेखील उपचार घेत होता. या आरोपीने योग्य संधी साधून धूम ठोकली.

Advertisement

पोलिसांचे आवाहन :- संबंधित आरोपीला जानेवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. तो जानेवारी 2018 पासून जिल्हा कारागृहात होता. दगडे याने 20 जुलैला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या नेहुली येथील कोविड आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले.

व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा दगडे याची उंची 165 सेमी इतकी आहे. त्याच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलिसांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement