Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

जगातील सर्वात महागडे फळ; 18 लाख रुपयांना विकले गेले 2 खरबूज

0 2

MHLive24 टीम, 3 जून 2021 :- जगातील सर्वात महागड्या फळांबद्दल तुम्हाला माहिती आहे काय? कदाचित यापूर्वी आपण या प्रश्नाबद्दल कधीही विचार केला नसेल. कारण सर्वसाधारणपणे भारतात कोणतेही फळ दर किलोला 200-300 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात नाही.

पण जगातील प्रत्येक फळ इतके स्वस्त नसते. जगातील सर्वात महाग फळं सोन्या-चांदीपेक्षा महाग आहेत. जगातील सर्वात महाग फळ म्हणजे जपानचे युबरी खरबूज. अलीकडे अशी दोन खरबूज 18 लाख रुपयांना विकली गेली आहेत.

Advertisement

2 युबरी खरबूज जपानमध्ये विकले गेले :- जपानच्या हक्काइडोच्या बेटावर हंगामाच्या सुरूवातीला दोन आयकॉनिक युबरी खरबूज पारंपारिक लिलावात 2.7 मिलियन येन (अंदाजे 25,000 डॉलर्स , जे 18,19,712 रुपये इतके आहे) विकले गेले. हे मागील वर्षाच्या किंमतीपेक्षा 22 पट अधिक आहे.

50 लाख येन पर्यंत विकले गेले खरबूज :- मागील वर्षी, खरबूजांची एक जोडी 120,000 येनला विकली गेली, जी साधारणत: हंगामाच्या सुरूवातीला विकले जाणारे युनिट आहे. कोरोनाव्हायरसमुळे, या खरबूजांची किंमत अशी राहिली. वर्षभरापूर्वी त्याच खरबूजांची एक जोडी घाऊक बाजारात लिलावात विकली गेली पाच मिलियन अर्थात किंवा 50 लाख येन येन, जी आज 33 लाखाहून अधिक आहे.

Advertisement

युबरी खरबूज कोठे वाढतात?:- युबरी खरबूज जपानमध्ये वाढतो. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक युबरी खरबूज जपानमध्येही विकले जातात. युबरी खरबूज जपानच्या बाहेर क्वचितच निर्यात केले जातात. आश्चर्य म्हणजे इतके महागडे असूनही या फळाची मागणी खूप जास्त आहे. फळ सामान्यतः सूर्यप्रकाशामध्ये वाढतात. हे खरबूज ग्रीनहाऊसमध्ये घेतले जाते.

भारतीय खरबूजांपेक्षा 1 लाख पट अधिक महाग :- भारतात उन्हाळा सुरू झाला आहे. काही दिवसातच तुम्हाला बाजारात खरबूज दिसू लागतील. सुरुवातीला खरबूज महाग असू शकतात पण हंगाम जसजसा वाढत जाईल तसतसे भारतामध्ये खरबूज प्रति किलो 20 रुपये पर्यंत मिळू शकतात. अशा प्रकारे, जर आपण भारतीय खरबूजची तुलना जपानी युबरी खरबूजशी केली तर त्याचे मूल्य 1 लाख पट जास्त आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup