हा नेता म्हणतो, ‘फोन टॅपिंगनं पाडली कर्नाटक, मध्य प्रदेशातील सरकारे’

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- पेगॅसस या तंत्राचा वापर करून, काँग्रेसची मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील सरकार भाजपने फोन टॅपिंग करून पाडले,’ असा गंभीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

संविधानविरोधी कृत्य

Advertisement

केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केला. फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडले, ही गंभीर बाब आहे. हे कृत्य संविधानविरोधी आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी.

राजभवनाबाहेर निदर्शने

Advertisement

पॅगेसस प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी राजभवनाबाहेर धरणे धरणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार असून तसे निवेदन राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चौकशी समिती स्थापन करा

Advertisement

विधानसभेत मी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. माझेही फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने ही समिती लवकर स्थापन करावी आणि या प्रकरणाची माहिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

आमचं ठरलंय, तयारीही सुरू

Advertisement

या वेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार केला. या निवडणुका स्वबळावर लढण्याचं आमचं ठरलं आहे. त्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचं पालन सर्वांनाच करावं लागतं. त्यामुळे सगळे नेते त्यासाठी तयार आहेत, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही

Advertisement

कोरोना रोखण्यात आलेलं अपयश झाकण्यासाठी ते दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, लस पुरवण्याची सर्व व्यवस्था केंद्राने आपल्या हातात ठेवली होती. राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने न्यायालयात सादर केलं, त्यात तथ्य आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही.

नाशिकमध्ये जी घटना झाली, तो अपघात होता. तिथे भाजपची सत्ता महापालिकेत आहे. ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात तिथे भ्रष्टाचार झाला. आपल्या शेजारी भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, गोव्यात ऑक्सिजनअभावी लोक मेले. या सगळ्या पापाचे भागीदार भाजप आहे, अशी टीका त्यांनी केली.

Advertisement

मोदीच जबाबदार

देशाच्या लोकांना लस मिळत नाही. आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तानला लस मोफत दिली जाते. त्यामुळे आपल्याला टाळेबंदीला सामोरं जावं लागतं. लोकांचा रोजगार बुडत आहे, लोक देशोधडीला लागले आहेत. या सगळ्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup