Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

तरुणांना अत्यंत फायदेशीर असणारा पण दुर्लक्षित राहिलेला रेशीम उद्योग; जबरदस्त कमाई करून देणाऱ्या या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती…

0 21

MHLive24 टीम, 11 जुलै 2021 :- राज्याची भौगोलिक परिस्थ‍िती आणि हवामान अंदाज पहाता रेशीम शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. या शेतीसाठी कमी खर्च लागतो आणि पाण्याचे प्रमाण कमी असतानाही उत्पादन येते. त्यामुळे रेशीम शेती ही ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी फायदेशीर आहे.

शेतकरीवर्ग सातत्याने दुष्काळाशी सामना करत असतो आणि हवामानामध्ये तसेच पर्यावरणामध्ये काही बदल झाले की त्या बदलांचा त्याला फटका बसतो. तो उद्ध्वस्त होतो. त्यावर पर्याय काय ? असा विचार सातत्याने सुरू आहे.

Advertisement

शेतकर्‍यांना हवामानाचा फटका न बसणार्‍या काही उद्योगांची जोड देता आली तर सातत्याने बसणार्‍या फटक्यातून त्याची सुटका होऊ शकते. म्हणूनच असे काही उद्योग केले पाहिजेत की, जे त्याला या ङ्गटक्यातून वाचवतील. रेशीम उद्योग हा असा एक उद्योग आहे की, जो निसर्गाच्या फटक्यांना बळी पडत नाही.

सुरवातीला आपण तुती रेशीम व इतर पिकांची तुलनात्मक माहिती पाहूया 

Advertisement

ऊस: एक एकर, पिकाचा कालावधी-तीन वर्ष, उत्पादन सुरुवात-1 वर्ष 5 महिने, पाण्याची आवश्यकता दोन हजार एमएम 420 दिवसांकरिता, भरपूर खते-आवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी 50 टन, सरासरी दर-तीन हजार प्रती टन, निव्वळ उत्पन्न-52 हजार रुपये.

केळी: एक एकर, पिकाचा कालावधी-1 वर्ष 5 महिने, उत्पादन सुरुवात, दोन वर्ष, पाण्याची आवश्यकता 4275 एमएम 420 दिवस, खते भरपूर, आवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-15 टन, सरासरी दर 10 हजार प्रती टन, निव्वळ उत्पन्न 1 लाख रुपये.

Advertisement

संत्रा: एक एकर, पिकाचा कालावधी-15 वर्ष, उत्पादन सुरुवात- चार ते पाच वर्ष, पाण्याची आवश्यकता 1150 एमएम, 420 दिवसांकरिता, खताचे प्रमाण कमी, आवश्यकतेनुसार कीटकनाशके, उत्पन्न सरासरी-20 टन, सरासरी दर पाच हजार प्रती क्विंटल, निव्वळ उत्पन्न एक लाख 30 हजार रुपये.

रेशीम शेती: एक एकर, पिकाचा कालावधी-10 ते 15 वर्ष, उत्पादनाला सुरुवात-6 महिने, पाण्याची आवश्यकता-1440 एमएम 420 दिवसांकरिता, खताचे प्रमाण कमी, कीटकनाशके फवारणी नाही, उत्पन्न सरासरी (400 किलो कोष), सरासरी दर-300 ते 350 प्रतिकिलो दर, निव्वळ उत्पन्न 1 लाख 20 हजार.

Advertisement

महाराष्ट्रात हा व्यवसाय कोठे आणि कसा चालतो ? :- महाराष्ट्रात हा व्यवसाय नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात चांगला रुजला आहेच पण आता तो पुणे जिल्ह्यातही केला जायला लागला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात दोन हजार ५०० हेक्टर जमिनीवर हा उद्योग केला जात आहे आणि त्यातून अनेक शेतकर्‍यांनी चांगले उत्पन्न मिळवून आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे.

रेशमाचा किडा हा एक महिना जगतो आणि त्यातले २४ दिवस झाडांची पाने खातो. राहिलेल्या सहा दिवसात तो आपले घर बांधतो. सुरक्षित रहाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भोवती तो संरक्षक कवच तयार करतो. हे कवच म्हणजेच कोष. ते कोष प्राप्त केले की त्याच्यात त्याने खाल्लेल्या झाडाच्या पानाचे रूपांतर तलम धाग्यात होते.

Advertisement

सहा दिवसात या कोषात ७०० ते १२०० मीटर लांबीचा तलम धागा तयार होतो. हा धागा प्राप्त करायचा आणि त्या पासून कपडा तयार करायचा हाच आपला रेशीम उद्योग. रेशमाच्या किड्यांनी तयार केलेल्या या धाग्यांचे कोष उकळत्या पाण्यात टाकले जातात आणि त्यापासून धागा मिळवला जातो.

शेतकरी वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञान

Advertisement

सुधारित वाण :- सन १९९५ च्या दरम्यान तुतीच्या एम-५ सारख्या वाणाचा वापर व्हायचा. त्याची एकरी १४ टनांपर्यंत कमाल उत्पादकता होती. खरे तर त्याहून कमीच उत्पादन मिळायचे. आज तुतीच्या व्ही-१ या सुधारित जातीची उपलब्धता झाली आहे. या वाणाचे एकरी १८ ते २० टन तर सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनातून कमाल २६ टनांपर्यंतही उत्पादन मिळू शकते.

लागवडीची पद्धत व अंतर :- पूर्वी तुतीची लागवड तीन बाय तीन फूट असायची. एकरी झाडांची संख्या ४८८० पर्यंत असायची. आज पाच अधिक तीन बाय दोन फूट असे लागवडीचे अंतर शेतकरी वापरतात. जोडअोळ पध्दत लोकप्रिय झाली आहे. मराठवाड्यात ९० टक्के शेतकरी चार बाय दोन फूट अंतरावर लागवड करतात.
एकरी झाडांची संख्या आज ५४४५ पर्यंत येऊन पोचली आहे. साहजिकच उत्पादनवाढीला मदत मिळाली आहे.

Advertisement

खाद्याची फांदी पध्दत :- पूर्वी किटकांना पाने तोडून दिली जायची. त्यावेळी दिवसातून चार वेळा पाला टाकावा लागे. आता फांदी पध्दतीने खाद्य दिले जाते. दिवसातून दोनच वेळा हे काम होत असल्याने मजुरी व वेळेतही बचत होऊ लागली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement