भारतात आली सर्वात हायस्पीड इलेक्ट्रिक कार; काही सेकंदात बनेल ‘रॉकेट’

MHLive24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- वेगाची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता जगातील सर्वात वेगवान कार भारतात दाखल झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक इलेक्ट्रिक कार आहे जी मुंबईतून भारतीय स्टार्टअप वझिरानी ऑटोमोटिव्ह घेऊन येत आहे.(Highest speed electric car)

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने पसरत आहे आणि हळूहळू सामान्य लोक आता ईव्हीकडे वळत आहेत.

शानदार लुक, दमदार बॅटरी

Advertisement

एकॉन्क असे या कारचे नाव असून ती सिंगल सीटर कार आहे. ही जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारपैकी एक असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. स्टार्टअपने मंगळवारी त्याची ओळख करून दिली आहे.

कारचा लूक खूपच मस्त आहे आणि ती एखाद्या रेसिंग कारसारखी दिसते. कारचे वजन सुमारे 740 किलोग्रॅम आहे आणि इनोवेटिव बॅटरी सोल्यूशन्स वापरते. हे तंत्रज्ञान सध्याच्या कॉम्प्लेक्स लिक्विड कूलिंगपेक्षा अधिक प्रगत आहे.

309 kmph ची टॉप स्पीड

Advertisement

कारमध्ये शक्तिशाली 722 हॉर्सपॉवर इंजिन देण्यात आले असून कंपनीने अलीकडेच इंदूरमध्ये या इलेक्ट्रिक हायपरकारची चाचणी देखील केली आहे. यावेळी कारने 309 किमी प्रतितास इतका वेग गाठला होता. विशेष म्हणजे ही कार 2.54 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

कारच्या नावातही एक विशेष अर्थ दडलेला आहे. एकोंक हा शब्द ‘दैवी प्रकाशाची सुरुवात’ शी संबंधित आहे. वझिरानी ऑटोमोटिव्हचे संस्थापक आणि सीईओ चंकी वझिरानी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनाने जगभरातील कंपन्यांना कोऱ्या कॅनव्हासपासून सुरुवात करावी लागेल. या ईव्ही युगात भारतासाठी तयारी करण्याची आणि पुढे जाण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

कंपनी एकॉन्क कडून डेटा आणि तांत्रिक संकलन त्याच्या पूर्ण उत्पादन आवृत्तीमध्ये वापरेल. ही भारतातील पहिली हायपरकार आहे, जी कंपनीने 2018 मध्ये गुडवुड फेस्टिव्हल दरम्यान कॉन्सेप्ट मॉडेल म्हणून सादर केली होती. आता कंपनी ग्राहकांसाठी एकोंकची लिमिटेड सीरीज तयार करू शकते.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker